समता शिक्षक परिषदेच्या अमळनेर तालुकाध्यक्ष पदी सर्जेराव शिसोदे


अमळनेर प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेची सहविचार सभा जळगाव येथे गुरुवारी पद्मालय शासकीय विश्रामगृहात पार पडली. सदर सभा समता परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.भरत शिरसाठ यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.यावेळी समता शिक्षक परिषदेच्या माध्यमिक विभागाच्या अमळनेर तालुकाध्यक्ष पदी तालुक्यातील माध्यमिक विद्यालय कु-हे शाळेचे उपशिक्षक सर्जेराव देविदास शिसोदे यांची निवड करण्यात आली प्रा.भरत शिरसाठ यांनी त्यांना नियुक्ती पत्र दिले. यावेळी समता परिषदेचे राज्य पदाधिकारी प्रमोद आठवले, राज्य उपाध्यक्ष रावसाहेब जगताप, जिल्हाध्यक्ष गणेश बच्छाव , रणजित सोनवणे, प्राथमिक चे जिल्हाध्यक्ष अजय भामरे (पूर्व) शैलेश शिरसाठ (पश्चिम) आदी जिल्हा/तालुका पदाधिकारी उपस्थित होते. समता शिक्षक परिषद ही फुले- शाहू- आंबेडकर- विचारांवर चालणारी संघटना आहे. शिक्षकांमध्ये संवाद वैधानिक मूल्ये रुजवणे, समताधिष्टत समाज निर्माण करणे, शिक्षकांबद्दल शासनाने घेतलेल्या अन्यायकारक निर्णयाविरुद्ध आंदोलन करणे व विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार शिक्षण संधी उपलब्ध करून देणे हे आपल्या हातून काम चालू राहील तसेच तालुक्यातील शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी ही संघटना कटिबद्ध राहील अशी ग्वाही नवनियुक्त तालुकाध्यक्ष श्री शिसोदे यांनी दिली.