

शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी कायमच बांधिल राहील-शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे
देशाच्या इतिहासाची जडणघडण करणाऱ्या, देश विकासासाठी नवी बौद्धिक आणि सशक्त पिढी घडविणाऱ्या शिक्षकांच्या अनेक समस्या आहेत त्या समस्या सोडविण्यासाठी मी कायम बांधील असून लवकरात लवकर शिक्षकांच्या पेन्शनचा प्रश्न , राज्यातील काही जिल्ह्यातील शिक्षकांचे वेतन राष्ट्रीयकृत बँकेत व्हावेत, वरिष्ठ व निवड श्रेणी संदर्भातील शिक्षकांच्या असणाऱ्या अडचणी दूर करण्याकरता मा.मुख्यमंत्री, मा. शिक्षणमंत्री यांच्याशी चर्चा करून हे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे कोकण विभागातील शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी जळगाव येथे कास्ट्राईब शिक्षक संघटनेने आयोजित केलेल्या बैठकी प्रसंगी बोलताना व्यक्त केले बैठकीच्या अध्यक्षस्थानी कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष रवींद्र पालवे हे उपस्थित होते. त्यांनी राज्यभरातल्या शिक्षकांच्या असणाऱ्या अडचणी व शालेय अध्यापनात येत असणाऱ्या सततच्या समस्या या संदर्भात मांडणी करीत आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक डॉ. मिलिंद बागुल यांनी केले. मान्यवर अतिथींचे स्वागत विजयकुमार मौर्य, अनिल सुरळकर, आर. टी. सोनवणे, प्रा. उत्तम सुरवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. बैठकीस अतिरिक्त सरचिटणीस प्रभाकर पारवे, कैलास तायडे, बापू साळुंखे, किशोर साळुंखे, नितीन सोनवणे, किशोर म्हस्के, अविनाश बागुल, मुकुंदा इंगळे, जितेंद्र जावळे, रवींद्र पालवे, सुनील सोनवणे व अन्य शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापूराव पानपाटील यांनी केले याप्रसंगी झालेल्या चर्चेत कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे अतिरिक्त सरचिटणीस प्रभाकर पारवे, डॉ. मिलिंद बागुल, प्रा. उत्तम सुरवाडे, बापू साळुंखे, कैलास तायडे यांनी सहभाग घेतला.