अन्न वस्त्र निवाऱ्यापासून वंचित असणाऱ्या बेघर बालकांचे गुरुकुल म्हणजे जीवन संवर्धन फाउंडेशन – डॉ.यशवंत म्हात्रे
भारतीय संस्कृतीची ओळख होण्यासाठी आम्ही या गुरुकुल मध्ये भाऊबीज निमित्त फराळाचे केले वाटप- डॉ. मनिलाल शिंपी


ठाणे,कल्याण (प्रतिनिधी)
मानव सेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ.मनिलाल शिंपी व दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जीवन संवर्धन गुरुकुल अनाथ आश्रमातील चिमुल्यांसोबत दिवाळी भाऊबीज सणाचा आनंद मानव सेवा ग्रुपच्या माध्यमातून पाहायला मिळाला. यावेळी भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ. यशवंत म्हात्रे,दैनिक स्वराज्य तोरणचे संपादक डॉ.किशोर बळीराम पाटील, मोहना मार्केट कमिटीचे अध्यक्ष,दानशूर व्यक्तिमत्व श्री. लक्ष्मण काशिनाथ तरे यांच्या शुभहस्ते दिवाळी निमित्त करंजा शंकरपाळी लाडू चकली भाकरवाडी व स्वीट अशाप्रकारे फराळ वाटप करण्यात आला.
जीवन संवर्धन फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष श्री. सदाशिव चव्हाण यांचे मी प्रथम आमच्या मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपच्या वतीने आभार मानतो, कारण त्यांनी अशा बालकांना एकत्र केले आहे की त्या बालकांचे पालकत्व स्वीकारले आहे, कारण ही मुलं सर्व रेल्वे स्टेशनला भीक मागून चोऱ्या करून लूटमार करून आपल्या पोटाची खलगी भरत असताना त्यांना नजरेत पडली व त्या बालकांना त्यांनी अंधारातून प्रकाशाकडे आणण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे, यामुळे या बालकांचे भविष्य उज्वल होत आहे त्यांना प्रेम जिव्हाळा शिस्त व शिक्षण यामध्ये आता आत्मविश्वास वाढला आहे म्हणूनच
अन्न वस्त्र निवाऱ्यापासून वंचित असणाऱ्या बेघर बालकांचे गुरुकुल म्हणजे जीवन संवर्धन फाउंडेशन होय असे डॉ.यशवंत अनंत म्हात्रे यांनी यावेळी सांगितले. जीवन संवर्धन फाउंडेशन अनाथ आश्रमातिल
भारतीय संस्कृतीची ओळख होण्यासाठी या ठिकाणी गुढीपाडवा, गोपाळकाला, होळी ,रंगपंचमी, दसरा ,दिपावली, गणेशोत्सव, मकर हे सर्व सण साजरी केली जातात त्यामुळे आम्ही या गुरुकुल मध्ये भाऊबीज निमित्त फराळाचे वाटप करून त्यांना भारतीय संस्कृतीची ओळख करून दिली असे यावेळी डॉ. मनीलाल शिंपी यांनी सांगितले.
जीवन संवर्धन फाउंडेशन अनाथ आश्रम चे संस्थापक अध्यक्ष श्री.सदाशिव चव्हाण यांच्या माध्यमातून बदलापूर, ठाणे, टिटवाळा, भिवंडी, परिसरात जवळपास २००अनाथ बालकांचे जीवन आनंदमय होत आहे. यासाठी स्वयंसेवक म्हणून सुजाता मॅडम,स्वप्नील भोर, यांच्यासह अधिक्षक यांनी विशेष मेहनत घेत आहेत, व मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपचे आभार व्यक्त करत सांगितले की मानव सेवा ग्रुप च्या माध्यमातून आमच्या चिमुकल्यांना येथे मदत कायमच होत असते यासाठी मानव सेवा ग्रुप स्तुत्य उपक्रम राबवत आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे यावेळी संस्थापक अध्यक्ष सदाशिव चव्हाण यांनी सांगितले.