• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

कल्याण डोंबिवली महानगपालिका आणि आट्या पाट्या असोसिएशन तर्फे राज्य क्रीडा दीन उत्साहात संपन्न. क्रीडा क्षेत्रातील परिवर्तनासाठी परिसंवाद! होणे गरजेचे आहे: रणजित खाश्याबा जाधव

Jan 16, 2024

Loading

कल्याण डोंबिवली महानगपालिका आणि आट्या पाट्या असोसिएशन तर्फे राज्य क्रीडा दीन उत्साहात संपन्न. क्रीडा क्षेत्रातील परिवर्तनासाठी परिसंवाद! होणे गरजेचे आहे: रणजित खाश्याबा जाधव

ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) ‘१५ जानेवारी हा दिवस खाशाबा जाधव पहिला महाराष्ट्र राज्य क्रीडा दिन’ या निमित्ताने कल्याण डोंबिवली महानगरपालिका व ठाणे जिल्हा आट्या पाट्या असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य अत्रे रंगमंदिर, कल्याण येथे ‘क्रीडा परिवर्तनासाठी परिसंवाद’ या उद्देशाने महानगरपालिका क्षेत्रातील क्रीडा: प्रगती, आव्हाने व संधी या विषयावर वैविध्यपूर्ण विषयांवरील चर्चा घडवून आणणारा परिसंवाद संपन्न झाला. क्रीडा परिसंवादाप्रसंगी मा . आमदार व ठाणे जिल्हा आट्या पाट्या असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय आप्पासाहेब शिंदे, कोकण विभाग शिक्षक आमदार मा. श्री. ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब, शिक्षक आमदार, कोकण विभाग, मा.आमदार नरेंद्र पवार साहेब, मा. आमदार, कल्याण पश्चिम विधानसभा, मा. रणजित खाशाबा जाधव व त्यांच्या धर्मपत्नी सौ. भारतीताई रणजित जाधव, मा. श्रीमती अर्चना दिवे , उपायुक्त सामान्य प्रशासन, मा. धैर्यशील जाधव साहेब, उपायुक्त शालेय शिक्षण व क्रीडा, श्रीमती स्नेहा करपे मॅडम, सहाय्यक आयुक्त, मा. प्रविण कांबळे, क्रीडा पर्यवेक्षक, श्रीमती सायली जाधव, तालुका क्रीडा अधिकारी आणि हास्यजत्रा कलाकार कु. शिवाली परब, श्री. निमिष कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार्थी (कबड्डी मार्गदर्शक) प्रशांत चव्हाण तसेच पॅरा कबड्डी राष्ट्रीय खेळाडू कु ‌ अजय पाटील यांचा सत्कार आदरणीय आप्पासाहेब शिंदे यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
परिसंवादाचे पूर्ण नियोजन व व्यवस्थापन अतिशय उत्कृष्टपणे केले.
क्रीडा परिसंवादात सहभागी झालेले वक्ते हे महानगरपालिका क्षेत्रातील क्रीडा क्षेत्राला योगदान दिलेले असे दिग्गज होते आणि याला भर पडली ती परिसंवाद संचालक योगेश सावंत यांचा क्रीडा क्षेत्रातील अनेक वर्षांचा प्रत्यक्षानुभव! परिसंवाद यशस्वीतेचे रहस्य म्हणजे, योगेश सावंत यांनी परिसंवादातील प्रत्येकाशी संवाद साधून केलेली पूर्व तयारी, ही होय!

परिसंवाद खरोखर वाखाणण्याजोगा झाला. यांचे मुख्य कारण म्हणजे प्रा. लक्ष्मण इंगळे यांनी सर्व शिक्षकांशी चर्चा करुन तयार केलेले मुद्दे!, सौ. पूर्वा मॅथ्यू यांचे स्वानुभवातून मांडलेले तंत्रशुद्ध मुद्दे!, सौ. सुप्रिया नाईकर यांनी आईच्या भूमिकेतून व्यक्त केलेली, माधूर्यपूर्ण शब्दांतून मांडलेली परखड मते!, अविनाश ओंबासे यांनी पत्रकारांच्या नकारात्मक दृष्टिकोनाला सकारात्मक दृष्टीक्षेपातून मांडलेली अभ्यासपूर्ण मते. महानगरपालिकेचे क्रीडा धोरण कार्यान्वित करण्यावर केलेली लक्षवेधी सूचना अधिक परिणामकारक ठरली., ठाणे जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्राचे नेतृत्व करण्याचा सकारात्मक दृष्टिकोन ठेवणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष म्हणून मा संजय कुलकर्णी यांनी महाराष्ट्र शासन, महानगरपालिका, पालक यांना उपयुक्त सूचना मांडल्या. शाळांमधील क्रीडा शिक्षक हे शालेय व्यवस्थापनात किती महत्त्वाचे आहेत, हे अधोरेखित करुन सांगितले.
परिसंवादात आदरणीय आप्पासाहेब शिंदे यांनी क्रीडा क्षेत्राला नाविन्यपूर्ण वळण देण्याची आवश्यकता व्यक्त केली व सौ. पूर्वा लोकरे यांनी खेळाडूंच्या क्रीडा विषयक समस्यांवर जो प्रकाश झोत टाकला तो मुद्दा उचलून धरला. मा. श्री. रणजित जाधव यांनी स़स्कारित खेळाडू देशाचे नाव उज्ज्वल करतो हे विविध उदाहरणांनी स्पष्ट केले. धैर्यशील जाधव साहेब, उपायुक्त शालेय शिक्षण व क्रीडा यांनी मॅरेथॉन बैठका घेऊन सर्व विषय निश्चित मार्गी लावता येतील, हे अतिशय सकारात्मक पद्धतीने स्पष्ट केले.
आचार्य अत्रे रंगमंदिर येथील परिसंवाद कार्यक्रम यशस्वी करताना नंदलाल पवार,अविनाश नलावडे, मधुकर पाटील, किरण तळेले, समीर भोईर, रेणूका पिसे, पूनम पार्टे , कृष्णा माळी , प्रविण खाडे, राजाराम पाटील, गणेश ठाकूर परिसंवादातील भूमिकेसह प्रा. लक्ष्मण इंगळे, प्राचार्या सौ. सुप्रिया नाईकर , अविनाश ओंबासे,कृष्णा बनगर, गजानन पाटील, मुकुंद गायधनी, तानाजी सहाणे, सौ. पूनम नाडकर मॅडम, सपना यादव मॅडम, स्वयंसेवक अभिषेक इंगळे, अकिब शेख, रोहित साबळे, सम्राट कांबळे, निशिता तरे, पोर्णिमा निवाते, ज्योती तळपे, अमोल गांगुर्डे, आशिष राठोड, सार्थक बांद्रे, तन्मय भिडे, वैभव खोराटे, अजिंक्य तेली, ओम बढे, सोनू टेपले, सर्वेश टेकाळे, आर्यन कदम, ‌ वैभवी चव्हाण,दीपाली बोडके, निकिता यांनी खूप मेहनत घेतली.
तसेच आचार्य अत्रे रंगमंदिरचे व्यवस्थापक माणिक शिंदे व त्यांचे सहकारी यांनी महत्त्वाची मदत केली. परिसंवाद यशस्वी करण्यासाठी सौ. लीना मॅथ्यू मॅडम यांनी काही महत्त्वाच्या सूचना व मार्गदर्शन केले.संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजनालासून नियोजनाची जबाबदारी चोखपणे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त क्रिडा संघटक अंकुर भिकाजी आहेर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *