
स्वामी विवेकानंद आधुनिक युगासाठी ज्ञानसूर्य…. हिमांशु पवार
अमळनेर.. पूज्य साने गुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर संचलित पूज्य साने गुरुजी मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातर्फे स्वामी विवेकानंद जयंती निमित्त युवकांसाठी युवा दिनानिमित्त स्वामी विवेकानंद इल्युमिनेटिंग विस्डम फॉर मॉडर्न एरा म्हणजे स्वामी विवेकानंद आधुनिक युगासाठी ज्ञानसूर्य या विषयावर हिमांशु पवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पू साने गुरुजी ग्रंथालयाचे चिटणीस प्रकाश वाघ उपस्थित होते तसेच प्रताप महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ एस आर चौधरी नगर परिषदेचे निवृत्त प्रशासन अधिकारी भाऊसाहेब देशमुख निवृत्त पोलीस उपनिरीक्षक नरसिंह वाघ पत्रकार ईश्वर महाजन दीपस्तंभचे स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक देवलसिंग पाटील प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते.
हिमांशु पवार यांनी आपल्या व्याख्यानात स्वामी विवेकानंदांच्या समकालीन व तत्पूर्वीची भारतातील राजकीय सांस्कृतिक सामाजिक परिस्थितीचा आढावा घेतला तत्कालीन परिस्थितीचा विवेकानंदांच्या व्यक्तिमत्त्वावर झालेला परिणाम तसेच नरेंद्र ते स्वामी विवेकानंद हा स्वामीजींचा जीवन प्रवास विस्तृतपणे मांडण्यात आला स्वामी विवेकानंदांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांचा स्वामीजींच्या जीवनावर पडलेला प्रभाव स्वामीजींचे बालपण युवावस्था त्यांचा भारत भ्रमंतीचा विस्तृत परिचय करून देत पाश्चिमात्य देशात केलेल्या महत्त्वपूर्ण कार्यावर प्रकाश टाकला स्वामी विवेकानंदांचे जीवनादर्श व कार्य आजच्या पिढीसाठी दिशादर्शक आहे त्यांचे विचार आपल्याला पुढील शेकडो वर्ष प्रेरणा देत राहतील असे प्रतिपादन हिमांशु पवार यांनी केले. आपल्या ओघवत्या शैलीत हिमांशु पवार यांनी स्वामी विवेकानंदांवर प्रभावीपणेआपले विचार मांडले व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित नगरपरिषदेचे निवृत्त प्रशासन अधिकारी भाऊसाहेब देशमुख म्हणाले की हिमांशु च्या रूपात आपल्याला एक चांगला वक्ता मिळाला. तसेच प्रताप महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ. एस आर चौधरी यांनीही हिमांशु चे कौतुक केले व भविष्यात पुढे मोठा वक्ता होशील असे आशीर्वादही दिले.सूत्र संचालन विजयसिंह पवार यांनी केले.