• Tue. Jul 8th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

ग्रामीण भागातील शाळांची काळजी गावाने घेतली पाहिजे तेच आपले मंदिर आहे – जयदीप पाटील

Feb 2, 2024

Loading

ग्रामीण भागातील शाळांची काळजी गावाने घेतली पाहिजे तेच आपले मंदिर आहे – जयदीप पाटील
शिरसाळे ता.अमळनेर येथे शिक्षक पालक मेळावा संपन्न
शिरसाळे येथील पूज्यश्री सानेगुरूजी शिक्षण प्रसारक मंडळ शिरसाळे संचलित भिका यशोद चौधरी हायस्कूल व हिरामण जीवन पाटील कनिष्ठ महाविद्यालय शिरसाळे येथे मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या उपक्रमांतर्गत शिक्षक पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.प्रताप महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य डॉ. एस ओ माळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून नोबेल फाउंडेशन जळगांवचे अध्यक्ष जयदीप पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष संजय रामचंद्र शिरोडे उपाध्यक्ष संतोष धंजी चौधरी सचिव जगतराव शंकर पाटील चेअरमन रामलाल वंजी पाटील संचालक युवराज भावराव पाटील गोरख रावण पाटील पोपट अर्जुन चौधरी ललित जयंतीलाल शाह विनायक सोमा पाटील पुंजु दगडू कुंभार रमेश विरचंद जैन श्रीराम मंदिर संस्थान नंदगावचे अध्यक्ष प पू. ईश्वरदासजी महाराज नंदगावचे सरपंच दामोदर पाटील मुख्याध्यापक पी ए भदाणे प्रमुख पाहुणे म्हणून व्यासपीठावर उपस्थित होते.
ग्रामीण भागातील शाळांची काळजी गावाने घेतली पाहिजे तेच आपले मंदिर आहे आपल्या देशाने शिक्षण विज्ञान अध्यात्म यांच्यात प्रगती केली आहे.पुस्तके वाचल्याने आपले भविष्य उन्नत होते.विद्यार्थी पालक यांनी मोबाईलचा वापर शक्यतो कमी करा.जीवन जगत असताना शील व चारित्र्य घडविणे खूप महत्त्वाचे आहे. असे प्रतिपादन नोबेल फाउंडेशन जळगांवचे अध्यक्ष जयदीप पाटील यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलतांना केले. अध्यक्षीय भाषणात बोलताना डॉ एस ओ माळी म्हणाले की शाळेचे संचालक मंडळ व शिक्षक यांच्या योग्य नियोजनाने ग्रामीण भागातील शाळा असून शिक्षणाची गुणवत्ता चांगली आहे.पुढील काळात शाळा आणखी प्रगती पथावर जाईल.
मेळाव्या दरम्यान पंचक्रोशितील तरवाडे आर्डी अनोरे खडके पिंपळे बु पिंपळे खु चिमणपुरी ढेकु झाडी गलवाडे शिरसाळे जैतपिर नंदगांव येथील सरपंच पोलीस पाटील शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक इत्यादी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यासोबत गावातील आरोग्य कर्मचारी ग्रामसेवक तलाठी इत्यादी कर्मचाऱ्यांचे सत्कार करण्यात आले.मुख्याध्यापक पी ए भदाणे यांनी आपल्या मनोगतात शाळेच्या वाटचालीची माहिती दिली. शाळेचे माजी विद्यार्थी स्टेशन मास्टर मधुकर गोरख पाटील डॉ दिपाली यशवंत चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले.पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शिक्षक एस आर ठाकरे के पी संदांनशिव पी आर पवार एन आर जैन यांनी सूत्र संचलन केले विजयसिंह पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर शिक्षक एम बी सोनार आर आर पाटील आर एन साळुंखे डी डी धनगर एस आर जैन के पी चौधरी. अमृत महाले इत्यादींनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले.प्रा.एस बी चौधरी यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed