
अमळनेर येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात प्रोजेक्ट माॅडेलचे प्रदर्शन
अमळनेर प्रतिनिधी
धनदाईमाता एज्युकेशन सोसायटी संचलित औद्योगिक प्रशिक्षण केंद्र ढेकू सिम रोड अमळनेर येथे फिटर,विजतंत्रीच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रोजेक्ट माॅडेलचे प्रदर्शन भरविले होते. संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब डी डी पाटील यांनी या प्रोजेक्ट्स माॅडेलचे फित कापून उद्घाटन केले. यात फिटर १२, विजतंत्रीचे १० विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तम माॅडेल प्रदर्शनात मांडले होते.
मा.प्राचार्य श्री नितीन एम.पाटील सर,विजतंत्री निर्देशक श्री .भुषण के पवार सर,फिटर निर्देशक श्री.राजेंद्र बी.महाजन सर,फिटर निर्देशक श्री.भुषण के.पाटील सर यांचे शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.