
‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ उपक्रमांतर्गत आदिवासी विभागातील आश्रमशाळांची तपासणीत उपेक्षा
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुक्यातील ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ हे अभियान महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक – मुमंअ 2023/ प्र.क्र.114/ एसडी-6, दिनांक – 30 नोव्हेंबर, 2023 च्या शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये प्रेरणादायी वातावरण निर्माण होण्यासाठी हे अभियान 1 जानेवारी, 2024 ते 15 फेब्रुवारी, 2024 या कालावधीत राबविण्यात येत आहे.
सदर अभियानात आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळांनी देखील उत्कृष्ठ सहभाग नोंदविला परंतु सदर अभियानाचे मुल्यमापन हे 15 फेब्रुवारी, 2024 नंतर प्रत्यक्ष शाळांना भेटी देवून करायचे आदेश निर्गमित झाले असतांना देखील अमळनेर तालुक्यात शाळांना प्रत्यक्ष भेटी न करता मुल्यांकन केले गेले आहे असे आश्रमशाळेचे मुख्याध्यापक यांनी आक्षेप नोंदवला आहे.
सदर मुल्यांकन केंद्रस्तरावर प्रथम आलेल्या शाळेचे तालुका स्तरावर मुल्यांकन झालेच नाही. याबाबत गटशिक्षणाधिकारी यांना विचारणा केली असता तुमची हार्ड कॉपी कार्यालयास प्राप्त नाही असे उडवा उडवीचे उत्तर त्यांनी दिले. प्रत्यक्षात मात्र कार्यालयास फाईल सादर करण्याचे काम केंद्रप्रमुखांचे असतांना केंद्रप्रमुखांनी व गटशिक्षणाधिकारी शाळांना प्रत्यक्ष भेट देणे गरजेचे असताना तसे न करता कार्यालयात बसूनच शाळांना गुणांकनाचे काम पूर्ण करण्यात आले त्यामुळे प्रत्यक्ष काम केलेल्या शाळांना अशा प्रकारामुळे मुद्दामहून डावलण्याचे काम गटशिक्षणाधिकारी यांनी केले अशी आदिवासी विकास विभागातील आश्रमशाळांची धारणा आहे.
सदर बाबतीत मा. मुख्यमंत्री साहेब, शालेय शिक्षणमंत्री, शिक्षणाधिकारी या कार्यालयांकडे तक्रार करणार असल्याचे मुख्याध्यापक यांनी सांगीतले.
