
श्री.जे.जे.टी. विश्वविद्यालय राजस्थान येथून प्रा. निनाद जाधव यांना पी.एच.डी प्रदान.
ठाणे:भिवंडी (मनिलाल शिंपी) भिवंडी शहरातील कणेरी येथे राहणारे पद्मश्री अण्णासाहेब जाधव महाविद्यालय समाज उन्नती मंडळाचे संस्था अध्यक्ष डॉ.श्री.विजय पांडुरंग जाधव यांचे सुपुत्र बी.एन.एन.महाविद्यालयातील कला शाखेतील ग्रामीण विकास विषयाचे विभाग प्रमुख आणि कला शाखेचे उपप्राचार्य प्राध्यापक निनाद विजय जाधव यांना नुकताच
श्री.जे.जे.टी. विश्वविद्यालय राजस्थान विद्यापीठाच्या बाराव्या दीक्षांत समारोहात झारखंडचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन ,पश्चिम बंगालचे राज्यपाल डॉक्टर सी.व्ही. आनंद बॉस व जे.जे.टी युनिव्हर्सिटीचे चेअरमन डॉक्टर विनोद टीब्रेवाला यांच्या शुभहस्ते विद्यापीठाच्या बाराव्या दीक्षांत समारोहात
“ठाणे जिल्ह्यातील कृषी पर्यटन केंद्राचा चिकित्सक अभ्यास” हा विषय घेऊन गेली पाच वर्ष संशोधन करून डॉक्टरेट ही पदवी मिळवली आहे, सध्या प्रा.डॉ.श्री. निनाद विजय जाधव हे बी.एन.एन.महाविद्यालयातील कला शाखेतील ग्रामीण विकास विषयाचे विभाग प्रमुख आणि कला शाखेचे उपप्राचार्य आहेत.त्यांच्या या यशस्वी कार्याबद्दल व त्यांनी “ठाणे जिल्ह्यातील कृषी पर्यटन केंद्राचा चिकित्सक अभ्यास” साहित्यामध्ये संशोधनाबद्दल मिळवलेली पीएचडी ही अभिमानास्पद आहे त्यामुळे त्यांचे धर्म सेवक तथा समाज कल्याण न्यास या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सोन्या काशिनाथ पाटील यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांना दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ. श्री.किशोर बळीराम पाटील यांनीही शुभेच्छा देऊन अभिनंदन केले आहे.त्याच प्रमाणे त्यांचे भिवंडी महाविद्यालयातील प्राचार्य, उपप्राचार्य व सर्व प्राध्यापक वर्ग यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.