
दिनांक 22 रोजी अमळनेर नगरपालिका मार्फत वर्तमानपत्रात प्रकाशित करण्यात आलेल्या बिफ स्टॉल लिलाव प्रक्रिया रद्द करण्यासंदर्भात भारतीय जनता पार्टी अमळनेर व हिंदुत्ववादी संघटना तर्फे निवेदन
अमळनेर प्रतिनिधी
महाराष्ट्र पाणी संरक्षण दुरुस्ती मसुदा 1995 च्या तरतुदीनुसार महाराष्ट्र राज्यात गोवंश तसेच बैल वडू यांच्या हत्येवर प्रतिबंधक करण्यात आले आहे असुन अमळनेर नगर परिषद मार्फत संदर्भीय जाहिरातीद्वारे वर्तमानपत्रात बिफ स्टॉल विक्रीची फी (बीफ विक्रीचा परवाना हक्क) वसुली बाबत जाहीर प्रकटन देण्यात आले आहे. नगरपालिकेने परवाना देणे म्हणजे एका गोवंश हत्येसाठी कत्तल खाण्याची परवानगी देण्यासारखे असून सदर जाहिरात महाराष्ट्र पाणी संरक्षण दुरुस्ती मसुदा 1995 च्या तरतुदीला डावलण्याचे निदर्शनास आडळून आहे. त्यामुळे शहरातील सामाजिक व धार्मिक शांतता धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली असून सदर जाहीर लीला प्रक्रिया रद्द करण्यात यावी यासाठी भारतीय जनता पार्टी अमळनेर तर्फे नगरपालिका मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना निवेदन देण्यात आले. तसेच नगरपालिका मुख्याधिकारी यांनी या लिलावास तात्काळ स्थगिती देण्याचे आश्वासन दिले आहे.
याप्रसंगी भाजप शहराध्यक्ष विजय सिंग राजपूत, सरचिटणीस दिलीप ठाकूर,मोतीराम हिंदुजा सुभाष पाटील,दीपक भोई कमल कोचर,दीपक श्रावण पाटील,पंकज भोई, दिपक पाटील,महावीर मोरे,ईश्वर चौधरी, राहुल चौधरी, किरण बोरसे,सौरभ पाटील,निनाद जोशी,विजय बारी भारतीय जनता पार्टी अमळनेर विश्व हिंदू परिषद अंमळनेर बजरंग दल अमळनेर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व समस्त हिंदुत्ववादी संघटना यांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते…