मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा स्तुत्य उपक्रम
जेष्ठ टेलर रतिलाल शिंपी यांच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून , दोंडाइचा येथे, जागतिक टेलर दिनानिमित्त टेलर बांधवांना कैची वाटप कार्यक्रमाचे आयोजन!
कल्याण दी.२६(स्व.रा.तो)
मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपच्या माध्यमातून व श्री. क्षत्रिय अहिर शिंपी समाज यांच्या संयुक्त विद्यमाने धुळे जिल्ह्यातील मु.दोंडाईचा या ठिकाणी ग्रामीण भागातील जेष्ठ टेलर श्री.रतिलाल रामदास शिंपी (मु. परिवर्द्ये ,तालुका शहादा, जिल्हा नंदुरबार )यांच्या अमृत महोत्सव वर्षा निमित्ताने व जागतिक टेलर दिनानिमित्त शिवणकर्मी बांधवांना बुधवार दिनांक २८/०२/२०२४ रोजी धुळे जिल्ह्यातील दोंडाइचा येथे श्री.क्षत्रिय अहिर शिंपी समाज मंगल कार्यालय राऊळनगर, मालपुर रोड, मु.दोंडाईचा येथे कैची वाटप कार्यक्रमाचे आयोजन मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ. मनिलाल रतिलाल शिंपी,सौ. संगिता मनिलाल शिपी यांच्या सौजन्याने करण्यात आले आहे. मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपचे प्रमुख आर एस पी कमांडर डॉ.मनिलाल रतिलाल शिंपी यांच्या संकल्पनेनुसार, दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री. किशोर बळीराम पाटील,भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव डॉ. यशवंत अनंत म्हात्रे, समासेवक डॉ.रामचंद्र शांताराम देसले, स्वामी नारायण सभागृहाचे संचालक डॉ. दिनेश भाई ठक्कर, पोलीस पाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष श्री सोमनाथ बाळाराम ठाकरे, रोटरी क्लब डोंबिवली चे सचिव, उद्योजक, मोटिव्हेशनल स्पीकर डॉ.किशोर अढळकर, या सर्वांच्या सहकार्याने केले आहे. सदर कार्यक्रमाला आवर्जून दोंडाईचा परिसरातील सर्व शिवणकर्मी बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री. किशोर बळीराम पाटील
यांनी केले आहे.
