• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

अमळनेर विधानसभेत स्वीप मॅरेथॉन स्पर्धेत रामदास वडर आणि मनिषा गावीत विजेते!

Apr 2, 2024

Loading

अमळनेर विधानसभेत स्वीप मॅरेथॉन
रामदास वडर आणि मनिषा गावीत विजेते!

अमळनेर -जळगाव लोकसभा मतदार संघातर्गत 015 अमळनेर विधानसभा मतदार संघात दि 2 रोजी सकाळी 8.00 वाजता स्वीप कार्यक्रमा अंतर्गत मतदार जनजागृती करण्यासाठी मॅरेथान स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

पुरुष गटात रामदास वडर यांनी प्रथम क्रमांक, कृष्णा गायकवाड यांनी द्वितीय क्रमांक आणि राहुल पावरा यांनी तृतीय क्रमांक पटकावला. महिला गटात मनिषा गावीत यांनी प्रथम क्रमांक, शिल्पा हयाळीज यांनी द्वितीय क्रमांक आणि राजश्री देशमुख यांनी तृतीय क्रमांक पटकावला.

101 वर्षीय मतदार लकडाबाई रामचंद्र अहिरे यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे वितरित करण्यात आली. तसेच स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्रे देण्यात आली.

यावेळी प्रांताधिकारी महादेव खेडकर,तहसिलदार रुपेशकुमार सुराणा,पीआय विकास देवरे, नगरपरिषद मुख्याधिकारी तुषार नेरकर, निवडणूक नायब तहसिलदार प्रशांत धमके आणि तहसिल कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

या मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

मतदानाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी आणि नागरिकांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *