

देवगांव देवळी हायस्कूलमध्ये मुलींना सायकली वाटप
अमळनेर प्रतिनिधी-देवगांव देवळी येथील महात्मा जोतीराव हायस्कूलमध्ये मानव विकास कार्यक्रम सन २०२३-२४ अंतर्गत गरजू,पात्र लाभार्थी मुलींना सायकलीचे वाटप करण्यात आले..
इयत्ता आठवीतील विद्यार्थ्यांनीं कोमल संजय जाधव,कांचन संजय जाधव,निशा दिलीप जाधव,उज्वला रोहीदास पावरा,भारती बन्सिलाल पावरा या पात्र विद्यार्थ्यांंना शाळेचे मुख्याध्यापक अनिल महाजन , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक यांच्या उपस्थितीत सायकलीचे वाटप करण्यात आले.