
अमळनेरला पुस्तकाचे दालन उभारणीसाठी सानेगुरुजी ग्रंथालयाची व शेजारच्या दोन रूमची पाहणी
अमळनेर प्रतिनिधी
पूज्य सानेगुरुजी ग्रंथालय व मोफत वाचनालय अमळनेर येथे डाॅ.शामकांत देवरे,संचालक मराठी भाषा विकास संस्था मुंबई यांनी पुस्तकांचे गांव संर्दभात पुस्तकाचे दालन उभारणीसाठी ग्रंथालयाची व शेजारच्या आपल्या ताब्यातील दोन रूमची पाहणी केली असता त्यांनी दालन उभारणेसाठी सकारत्मकता दाखविली आहे. सदरप्रसंगी लोकमान्य टिळक स्मारकचे
अध्यक्ष श्री. बजरंग अग्रवाल,श्री.विवेक भांडारकर,श्री.आत्माराम चौधरी,प्रा.डाॅ.रमेश माने,सानेगुरुजी वाचनालयाचे चिटणीस प्रकाश वाघ,
श्री.दिपक वाल्हे श्री.निरज अग्रवाल उपस्थित होते.