सेवाव्रती आदर्श शिक्षक श्री. के.डब्ल्यू. चौधरी सर यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ उत्साहात संपन्न.

गौरीशंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रवंजे ता. एरंडोल. विद्यालयाचे ज्येष्ठ सेवाभावी शिक्षक श्री. के. डब्ल्यू. चौधरीसर यांचा सेवापूर्ती सत्कार समारंभ विद्यालय व आप्तेष्टांच्या वतीने विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय दादासो आर.एस.सानपसर यांच्या मार्गदर्शनाखाली व उत्तम सुरेख नियोजनाखाली एरंडोल येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
नवलभाऊ प्रतिष्ठान नवलनगर संस्थेचे मानद संचालक प्रा. सुनिल गरुडसर हे होते प्रमुखअतिथी म्हणून एरंडोल प. स. गटशिक्षणाधिकारी आदरणीय श्री. आर. डी. महाजन साहेब., जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा नियोजन मंडळाचे सदस्य आदरणीय भाऊसो नानाभाऊ महाजन, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी आदरणीय आबासो डी बी पाटीलसर,
रवंजे विद्यालयाचे स्थानिक स्कूल कमिटी चेअरमन तात्यासो संतोष विठ्ठल पाटील, मुख्याध्यापक संघाचे माजी तालुका अध्यक्ष आदरणीय दादासो राजू दादा पाटीलसर, पनवेल आर्मी स्कूलचे प्राचार्य आदरणीय आण्णासो एम.के मराठेसर, आर्मी स्कूल अंमळनेर प्राचार्य तात्यासो. एस. यु. पाटीलसर रोटवद माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय दादासाहेब व्ही. ए. सैंदाणेसर, पिंपळकोठा विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय तात्यासो श्री व्ही जी कोळीसर, संस्थेचे माजी मुख्याध्यापक आदरणीय आबासो हिम्मत पाटीलसर, माळसेवगे माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. व्ही सी पाटीलसर,एरंडोल वार्ताचे संपादक आदरणीय दादासो शिवाजीराव अहिररावसर मुख्याध्यापक संघांचे तालुका अध्यक्ष आदरणीय बापुसो.प्रमोद चिलाणेकरसर,जळगाव माध्य. पतसंस्था संचालक दादासो. भगतसिंग पाटील जेष्ठ शिक्षक नानासो. आर झेड पाटील सर आदरणीय दादासाहेब डॉ. डि. एस महाजनआदरणीय आण्णासो डॉ नलिन महाजन , रवंजे बु.गावाचे लोकनियुक्त सरपंच. आदरणीय भाऊसो. नामदेव आधार माळी रवंजे खु. गावाच्या लोकनियुक्त सरपंच ताईसो. सौ. सुरेखाताई चौधरी, रवंजे गावाच्या पोलीस पाटील ताईसो. शरयूताई चौधरी रवंजे खु.पोलीस पाटील दादासो किरण खामकर मा. सरपंच भाऊसो.लालचंद कोळी मा. सरपंच आण्णासो. गोकुळ देशमुख इत्यादी मान्यवर सेवापुर्ती गौरव सोहळ्यासाठीप्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
सेवापूर्ती समारंभासाठी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर अतिथींचा सत्कार विद्यालयाच्या व चौधरी परिवाराच्यावतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
सत्कारमूर्ती नानासो.श्री के. डब्ल्यू. चौधरीसर यांचा सेवापुर्ती निमित्त सर्व मान्यवराच्या शुभहस्ते सहपत्नीक सत्कार विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांच्यावतीने सुंदर असा चांदीचारथ भेटवस्तू ड्रेस शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापक संघाचे तालुका मा.अध्यक्ष राजूदादा पाटीलसर यांनी सत्कारमूर्ती नानासो. के.डब्ल्यू. चौधरी सरांचा कार्याचा गौरव करताना यांना भावी पिढी घडवणारा आदर्श दीपस्तंभ म्हणून सरांनी खूप मोठी जबाबदारी पार पाडली आहे. आणि अविरत ज्ञानदानाचा पवित्र कार्य करत आले आहेत. आदि गौरव उद्गार काढले.
पनवेल आर्मी स्कूलचे प्राचार्य आदरणीय आण्णासो. एम. के. मराठे सर. यांनी सत्कारमूर्ती आदरणीय चौधरी सरांच्या बालपणाच्या मैत्री पासून सरांचा संघर्षमय जीवनप्रवास आपल्या मनोगतातून व्यक्त केला.
सरांचा गुणगौरव करताना गुरुचे समाजातील स्थान किती महत्त्वपूर्ण आहे अविरत सेवा करीत असताना शेवटी गुरूंचा सन्मान होतो. गुरु अनेक विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडवत असतात व त्यांची उंची सतत वाढावी असे कोणी हितचिंतक असतील तर ते आई-वडिलांनंतर फक्त गुरु असतात असे. असे गौरवउद्गार काढले.
यांनी सत्कारमूर्ती सरांचा संघर्षमेय प्रवासातून सरांनी आपल्या परिवाराला सुसंस्कृत व उच्चशिक्षित करून त्यांचे मुलं सुना यांना उच्च पदावर विराजमान असल्याचा सार्थ अभिमान वाटतो असे गौरव उद्गार काढले. यापुढे सरांनी समाजसेवेसाठी अविरत कार्य करीत राहावे. अशा शुभेच्छा दिल्या.
सत्कारमूर्ती सरांच्या कार्याविषयी गौरव करताना संस्थेचे प्रशासकीय अधिकारी आदरणीय आबासो.डी बी पाटीलसर यांनी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय नानासाहेब यांनी शिक्षणाची गंगोत्री ग्रामीण भागातील तळागाळातील रंजल्या गांजल्यांसाठी सुरू करून ज्ञानदानासोबतच परिसरातील अनेक बेरोजगार तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या. अतिशय चांगल्या प्रकारे सरांनी आपल्या सेवाकाळात सेवा दिल्याबद्दल गौरव उद्गार काढले.
संस्थेचे मानद संचालक आदरणीय गुरुवर्य प्रा सुनीलजी गरुड सरांनी सत्कारमूर्ती श्री.के डब्ल्यू चौधरी सरांच्या सेवाकार्याविषयी बोलताना शिक्षकाचे समाजातील स्थान किती महत्त्वपूर्ण आहे. या सेवापूर्ती गौरव सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या मोठ्या उपस्थित वरून आपल्याला जाणवते. माणसात देव शोधणारे माणुसकी जोपासणारे अनेक माणसांचा गोतावळा निर्माण करणारे . मराठी भाषेवर उत्तम प्रभुत्व असलेले. गोरगरीब विद्यार्थ्यांना ज्ञानदानाबरोबरच सर्वकाही मदत करणारे उत्तम अध्यापन कौशल्य असणारे शाळेच्या व संस्थेच्या उत्कर्षासाठी अविरत परिश्रम घेणारे सेवापूर्ती सत्कारमूर्ती श्रीयुत चौधरीसर. आपण सेवानिवृत्त होत आहात. आपले उत्तम सूत्रसंचालन कला ज्या ज्या वेळी विद्यालयात विविध कार्यक्रम संपन्न होतील त्या त्या वेळेला नक्की आपली उणीव भासत राहील. आपल्या पवित्र ज्ञानदानाच्या कार्याच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी उच्चपदस्थ अधिकारी पदाधिकारी आपण घडवलेत. त्याचं फलित म्हणून आज हा भव्य सेवापूर्ती सोहळा आज संपन्न होत आहे.
गुणवंत विद्यार्थी घडवत असताना आदरणीय प्राध्यापक सुनील गरुड सरांनी आपले माजी विद्यार्थी अनेक उच्च पदावर प्राचार्य मुख्याध्यापक डॉक्टर इंजिनियर वकील प्रशासकीय अधिकारी.विराजमान पाहताना मनस्वी आनंद होतो व अभिमान वाटतो. आणि हे भाग्य फक्त शिक्षकांच्याच वाट्याला येतं अध्यक्ष आदरणीय नानासाहेब संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय बाळासाहेब श्री अनिकेत पाटील संस्थेच्या मार्गदर्शक संचालिका आदरणीय ताईसो.शिलाताई पाटील यांच्यावतीने सत्कारमूर्तींना शुभेच्छा देताना व संस्थेच्या कार्याविषयी माहिती देताना आदरणीय प्राध्यापक सुनील गरुड सरांनी सर्व गुरुजनांना आदरणीय नानासाहेबांनी सुरू केलेल्या या पवित्र ज्ञानयज्ञामध्ये सेवाभावी वृत्तीने सेवा देणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये सरांचे अनेक विद्यार्थी सेवारत असल्याबद्दल मला त्याचा स्वार्थअभिमान वाटतो व तुम्हाला मार्गदर्शन करताना अतिशय आनंद वाटतो आजचे सत्कारमूर्तीसर सुद्धा माझे माजी विद्यार्थी आहेत असे गौरवउद्गार काढले. व त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती नानासो. के डब्ल्यू चौधरी सरांनी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय नानासाहेब यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला सेवेची संधी दिली त्याबद्दल आदरणीय नानासाहेबांचे म्हणावे तेवढे आभार थोडेच आहेत तसेच आपल्या सेवाकाळातील अनुभव सांगताना अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला व व सेवाकाळात संस्थेचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी सहकाऱ्यांचे अनमोल असे सहकार्य लाभल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या सुंदर अशा कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय आर. एस सानपसर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुनिल वाघसर व दादासो.एन. वाय पाटील सर. तात्यासो. पी. बी. पाटील सर यांनी केले. तर आभार चौधरी सरांच्या परिवाराच्या वतीने त्यांच्या सुनबाई सौ.प्रज्ञा चौधरी मॅडम यांनी मानले.
सेवापुर्ती सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी यांनी परिश्रम घेतले.