
‘महात्मा फुले विचारधारा आणि मराठी साहित्य’ या ग्रंथाचे उद्या मुंबईत प्रकाशन
अमळनेर(प्रतिनिधी)दि.३मे
मुंबई विद्यापीठाच्या मराठी भाषा विभागातील प्रसिद्ध कवयित्री,साक्षेपी समीक्षक व संपादक प्रा.डॉ.वंदना महाजन व कादंबरीकार,समीक्षक डॉ. अनिल सपकाळ यांनी संपादित केलेल्या ‘महात्मा फुले विचारधारा आणि मराठी साहित्य’ या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा डॉ.भालचंद्र मुणगेकर यांच्या अध्यक्षतेखाली व काँ.डॉ.भालचंद्र कानगो,डॉ.वंदना सोनाळकर,डॉ.उमेश बगाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या शनिवार दि.४मे२०२४ रोजी सायंकाळी ५.३०वाजता भूपेश गुप्ता भवन,८५ सयानी रोड,प्रभादेवी, मुंबई याठिकाणी या मान्यवरांच्या शुभहस्ते प्रकाशन होणार आहे.तरी या सोहळ्यास अभ्यासक, संशोधक,प्राध्यापक,समीक्षक व चोखंदळ वाचकांनी उपस्थित राहावे.असे आवाहन लोकवाङ्मय गृहचे प्रकाशक राजन बावडेकर व मराठी विभाग प्रमुख डॉ.विनोद कुमरे यांनी केले आहे.