०४ मे रोजी रोटरी क्लब ऑफ जळगाव तर्फे मतदान जनजागृती मूलभूत अधिकार व स्काऊट शिक्षण एक संस्कार या विषयावर व्याख्यानांचे आयोजन…………… जळगाव दिनांक ०३ येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव मिडटाउन तर्फे दिनांक ०४ मे २०२४ शनिवार रोजी रात्री आठ वाजता रोटरी हॉल गणपती नगर जळगाव येथे व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे “मतदान जनजागृती मूलभूत अधिकार ” या विषयावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बी एल ओ (BLO) , उपशिक्षक रावसाहेब रुपचंद विद्यालय, जळगाव येथील प्रमुख वक्ते श्री गिरीश रमणलाल भावसार यांचे व्याख्यान होणार आहे तर स्काऊट शिक्षण एक संस्कार या विषयावर रावसाहेब रूपचंद विद्यालय जळगाव येथील स्काऊट विभाग प्रमुख श्री देवानंद भागवत पांढरे हे अभ्यासपूर्ण विचार मांडणार आहेत तरी सदर कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन रोटरी क्लब ऑफ जळगावचे अध्यक्ष श्री रो.आर. एन.कुलकर्णी तसेच मानद सचिव रो. ॲड. किशोर बी पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे
……