सेवानिवृत्तीनंतर सामाजिक कार्याला वेळ द्यावा-गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील
हंसराज सोनवणे यांचा सेवापुर्ती कार्यक्रम उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न


अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
सेवानिवृत्तीचा क्षण असतो मनाला हळवा करणारा पण त्यासोबतच आयुष्याला नवी दिशा देणारा असतो.आयुष्याच्या सेंकड इनिंगचा सदुपयोग करा.. मस्त फिरा आणि स्वस्थ राहा असे असे सांगत सेवानिवृत्तीनंतर सामाजिक कामाला प्राधान्य द्यावे असे पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील यांनी मंगळ ग्रह संस्थान येथे आयोजित
सेवापूर्ती सत्कार प्रसंगी कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना सांगितले…
हंसराज सुकदेव सोनवणे मुख्याध्यापक/ पदवीधर शिक्षक
जि.प.प्रा.शाळा कुऱ्हे खुर्द ता.अमळनेर यांचा सेवापूर्ती निरोप समारंभ दि.28/4/2024 रोजी मंगळ देव ग्रह मंदिरावर पार पडला.कार्यक्रमाला दादा साहेब श्री.रावसाहेब पाटील गटशिक्षणाधिकारी पं. स.अमळनेर तसेच भगिनी मंडळाची प्रा.शाळा अमळनेर च्या अध्यक्षा सौ.सरोज भांडारकर मॅडम व कार्यकारीणी सभासद उपस्थित होते. साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव संदीप घोरपडे, श्री.शरद सोनवणे ,श्री.किरण शिसोदे श्री.वाडीले सर हे केंद्र प्रमुख व मित्र परिवार तसेच सर्व नातेवाईक उपस्थित होते. जि.प.प्रा.शाळा कुऱ्हे खुर्द येथील शिक्षिका सौ.सुषमा सुर्यवंशी मॅडम व श्रीम.वैशाली पितृभक्त मॅडम हे उपस्थित होते. सोनवणे सरांची शिक्षण खात्यात एकूण सेवा 35 वर्षे एवढी सेवा झाली.ते दि.30 एप्रिल 2024 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांनी पाचोरा, चाळीसगाव,चोपडा,धरणगाव या तालुक्या सह अमळनेर तालुक्यात पिंपळी,तासखेडे,कुऱ्हे खुर्द या जि.प.प्रा.शाळांमध्ये सेवा दिली.कार्यक्रमाला दहीवद केंद्रातील सर्व शिक्षक उपस्थित होते. सोनवणे सरांना सर्व स्तरातून निरामय आरोग्याच्या शुभेच्छा दिल्या.मंगळ ग्रह संस्थे तर्फे सत्कार करणेत आला. कार्यक्रमाचे सूत्र संचलन श्री.कैलास माळी सर ग्रेडेड मुख्याध्यापक आंबापिंप्री यांनी केले.
आभार श्री.धीरज माळी पदवीधर शिक्षक नंदगाव यांनी मानले.यावेळी विविध संस्थांचे शिक्षक प्रतिनिधी, जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.