

डांगर चोपडाई कोंढावळ जंगलातील प्राण्यांसाठी असलेले कृत्रिम पाणवठे कोरडे पडल्याने जनावरांचे पाणी पिण्यासाठी होत आहेत हाल ..
अमळनेर प्रतिनिधी : तालुक्यातील डांगर चोपडाई कोंढावळ जंगलातील प्राण्यांसाठी असलेले कृत्रिम पाणवठे कोरडे पडल्याने जनावरांचे पाणी पिण्यासाठी हाल होत आहेत.
यावर्षी टंचाईची तीव्रता जाणवत असून तापमानाचा पारा ४३ पर्यंत गेल्याने कडक उन्हात माणसांसह जंगलातील प्राण्यांनाचेही हाल होत आहेत. पाण्यासाठी जनावरे वणवण भटकत आहेत. वनविभागाने सुरुवातीला कृत्रिम पाणवठ्यात टँकर ने पाणी टाकले होते. मात्र ते पाणी अपेक्षेपेक्षा आधी संपल्याने पाण्याच्या शोधार्थ जनावरे सैरावैरा धावत आहेत. वनविभागाने पाणवठ्यात पाणी टाकण्याची सोय करावी अशी मागणी डांगरचे राजेश वाघ यांनी केली आहे.
फोटो कँप्शन
आज डांगर बु. येथील जंगलात गेलो असता पाणवठ्यांवर पाणी नसल्याने जंगली प्राण्यांची पाण्यासाठी वणवण पहायला मिळाली. कोरडे ठाक असलेले पाणवठे.