• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेची प्राध्यापकांच्या प्रश्नांबाबत मा. कुलगुरूंसोबत चर्चा

May 22, 2024

Loading

मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेची प्राध्यापकांच्या प्रश्नांबाबत मा. कुलगुरूंसोबत चर्चा —
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठीय व महाविद्यालयीन मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेच्या शिष्टमंडळाने नुकतीच कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉ. विजय माहेश्वरी, प्र- कुलगुरू डॉ. एस. टी. इंगळे, वाणिज्य शाखा डीन डॉ. अनिल डोंगरे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत प्राध्यापकांना आणि विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी यासंदर्भात सविस्तर चर्चा केली.
विद्यापीठाचे विस्कळीत शैक्षणिक वेळापत्रक (अकॅडमीक कॅलेंडर) हे सततच्या कामांमुळे प्राध्यापकांची मानसिक आणि भावनिक घडी विस्कळीत करत आहे. तसेच विद्यार्थ्यांची शिक्षणामध्ये गोडी निर्माण होऊ देत नाही. त्याचबरोबर सध्याच्या अकॅडमी कॅलेंडरमध्ये शिकवणे कमी, परीक्षा व मूल्यांकन कालावधी जास्त ही स्थिती निर्माण झालेली आहे. वरील तत्त्वानुसार मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेतर्फे शैक्षणिक वेळापत्रक (अकॅडमी कॅलेंडर) 2024 – 2025 आणि परीक्षा कालावधीबाबत पुढील दुरुस्तीसाठी सूचना करण्यात आली. विद्यापीठ परीक्षेचा आणि मूल्यांकनाचा तसेच विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन प्रवेशाचा कालावधी हा प्राध्यापकांच्या सुट्टीवर अतिक्रमण करणारा नसावा या मागणीसह विद्यार्थी हिताच्या अनेक मागण्यांवर संघटनेच्या वतीने चर्चा करण्यात आली.
विद्यापीठ स्तरीय मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेच्या वतीने संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ.जयवंत मगर, संघटनेचे केंद्रीय सचिव डॉ. अनिल हिवाळे यांच्यासह इतरांनी माननीय कुलगुरू महोदयांसमोर आपली बाजू मांडली. माननीय कुलगुरू महोदय, प्र.कुलगुरू महोदय, डीन महोदय यांनी संघटनेचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. सुमारे दोन तास चाललेल्या चर्चेत समाधानकारक तोडगा निघाला. संघटनेने केलेल्या मागण्यांची विद्यापीठ प्रशासनाने लवकरात लवकर पूर्तता केली नाही तर मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेतर्फे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
या बैठकीसाठी संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष प्रा. डॉ. जयवंत मगर, केंद्रीय सचिव प्रा.डॉ.अनिल हिवाळे, सिनेट सदस्या प्रा.डॉ.मंदा गावित, अधिसभा सदस्य डॉ. सुरेखा पालवे, प्रा. संजीव साळवे, जळगाव जिल्हा सचिव डॉ.राहुल निकम, प्रा.डॉ. महेंद्रकुमार वाडे,डॉ बनसोडे, डॉ. सी एल सुरवाडे, डॉ. भालेराव, डॉ. संदेश धुम, प्रा. साहेबराव राठोड, डॉ.साहेबराव पडेलवार, डॉ राजेंद्र नाडेकर, डॉ.उत्तम सोनकांबळे, डॉ.मारोती गायकवाड, प्रा.डॉ.श्याम सोनवणे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. संघटनेच्या या आक्रमक भूमिकेमुळे सर्व प्राध्यापक बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *