• Wed. Jun 18th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

अ‍ॅड. कौस्तुभ पाटील यांच्या कार्यलयाचे उटघाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

Jun 7, 2024

Loading

अ‍ॅड. कौस्तुभ पाटील यांच्या कार्यलयाचे उटघाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील अभ्यासू वकील तथा युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. कौस्तुभ पाटील यांच्या द्वितीय ऑफिसचा शुभारंभ आज जिल्हा काँग्रेसचे जेष्ठ नेते भैय्यासाहेब संदीप पाटील व सेवानिवृत्त प्रांतअधिकारी श्री एच टी माळी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री संदीप घोरपडे प्रा. लीलाधर पाटील प्रा. अशोक पवार महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा सुलोचना वाघ उपस्थित होत्या. कमी वयात अ‍ॅड. कौस्तुभ पाटील यांनी आपले पुणे व अमळनेर या शहरात ऑफिस उघडून उत्कृष्ट कायदेशीर सेवा नागरिकांस उपलब्ध करून दिली आहे तसेच उच्च न्यायालय व जिल्हा न्यायालयातील अनेक महत्वपूर्ण केसेस मध्ये त्यांच योगदान ते देत असतात असा उल्लेख अ‍ॅड संदीप पाटील यांनी आपल्या भाषणात केला यावेळी सेवानिवृत्त प्रांत अधिकारी श्री एच टी माळी यांनी वकील आणि प्रशासकीय अधिकारी यांच्या नात्याबद्दल भाष्य केले श्री संदीप घोरपडे यांनी उपस्थित लोकांना मार्गदर्शन करताना सामाजिक वकिलीची संकल्पना विस्तृत पणे मांडली. सदर कार्यक्रमास राष्ट्रवादी ग्रंथालय सेल प्रदेश अध्यक्ष उमेश पाटील, रोहिदास दाजी पाटील,डॉ. सुशील वारुडे तसेच युवक काँग्रेस चे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री बी के सूर्यवंशी यांनी तर आभार डी ए धनगर यांनी व्यक्त केले..
यावेळी मित्र परीवार यांनी शुभेच्छा दिल्या..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed