• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

सावनेर नगरपालिकेतआंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न.

Jun 21, 2024

Loading

सावनेर नगरपालिकेत
आंतरराष्ट्रीय योग दिवस संपन्न.

आपले जीवन आनंदमय आणि निरोगी राहण्यासाठी योगसाधना करणे आवश्यक आहे: किरण बगडे

नागपुर,विशेष प्रतिनिधी ( मनिलाल शिंपी) आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त, सावनेर नगरपालिका कार्यालयात, मा.मुख्याधिकारी किरण बगडे,. प्रशासन अधिकारी गजानन पटले यांच्या प्रमुख उपस्थितीत आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.यावेळी न.प.प्राथमिक व न.प.हायस्कूल सावनेर येथील मुख्याध्यापक यांची उपस्थिती होती. आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र राज्य आर एस पी अँड सी डी चे उपाध्यक्ष
श्री.पितांबर एस.महाजन विशेष शिक्षक यांनी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सूरूवात केली.
पी.एस महाजन यांनी राष्ट्रीय योग दिनानिमित्त सूक्ष्म व्यायाम, योगासन, प्राणायाम, मेडीटेशन क्रिया व शरीर रिलॅक्ससेशन इ.योग क्रिया सर्वांकडून करून योगासनाचे महत्व पटवून दिले. शरीर व मनाचे आरोग्य सुधारून शरीर निरोगी कसे राखता याबाबात सविस्तर माहिती दिली.
राष्ट्रीय योग दिवस निमित्तांने.पंचायत समिती कार्यालय सावनेर येथील सर्व अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी बंधू भगिनी, सर्व शाळांमधील मुख्याध्यापक, सर्व शिक्षक बंधू भगिनी,कर्मचारी वृंद यांनी उपस्थित राहून योगदिवस यशस्वी करण्यासाठी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य करून योगाअभ्यास विषयी आपल्याला आलेला अनुभव व्यक्त केला.
आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त सावनेर नगरपालिकेचा मुख्याधिकारी बगडे मॅडम आपल्या जीवनात योगामुळे किती आनंद येऊ शकतो, आपण कायम निरोगी आयुष्य जगण्यासाठी नियमित योगा करण्याची काळाची गरज आहे असे सांगितले.व योग दिवस यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभले म्हणून सर्व उपस्थितांचे अभिनंदन, व कौतुक केले. कार्यक्रमाचा शेवटी चाचेरकर सर यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *