राज्यातील शैक्षणिक समस्या तातडीने सोडवण्यासाठी मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांसोबत महत्वपूर्ण बैठक संपन्न.

ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) राज्यातील शाळा महाविद्यालयांचा, व शिक्षकांचा समस्या तातडीने सोडवण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व शिक्षण मंत्री दीपक जी केसरकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत वर्षा निवासस्थानी बैठक संपन्न*
कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार मनिषा कायंदे , आमदार किरण पावसकर, आमदार तुकाराम काते, मा.आमदार श्रीकांत देशपांडे, शिवसेनेचे सचिव संजय मोरे, शिवाजी शेंडगे , रोहिणी ताई, उपस्थित होते
मीटिंगमध्ये सर्व खालील विषय निकाली काढले. अघोषित शाळा अनुदान देणे – संचालकांना आदेश देऊन कारवाई करण्यास सांगितली आहे.
अंशतः अनुदानित शाळांना पुढील टप्पा वाढ फाईल बजेटमध्ये घेतली आहे, दरवर्षी टप्पा वाढ दिला जाईल
– त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना राहिलेला टप्पा अनुदानासाठी बजेटमध्ये फाईल सादर केले आहे.
एक नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करणार ( कोर्टामध्ये अफेटीवेट पॉझिटिव्ह सादर करणार )
- 2005 नंतरच्या लोकांना पेन्शन लागू केली आहे त्याचे सूत्र लवकरच जाहीर करणार, आर्थिक व सामाजिक सुरक्षितेचे शासन देणार.
शेवटच्या वर्गाच्या पटसंख्येसाठी – राज्यातील वस्तुस्थितीचे विवरण मुख्यमंत्र्यांनी मागवला आहे.
बीएमसी शाळांच्या संदर्भात
– शिक्षकांना डीसीपीएस लागू करणार - रात्र शाळा शिक्षकांच्या समस्या सोडवणार
- दिव्यांग शाळांचे अनुदान मिळणार
- शाळांना वीजदर कमर्शिअल प्रमाणे दिले जाणार नाही
- अपंग समावेशित शिक्षकांना कायम करणे
- अर्धवेळ शिक्षकांना पूर्णवेळ करणे
- आर टी पुनर्माने रद्द करणे
- नवीन संचमान्यता संच मान्यता निकष दुरुस्ती करणे
- 25% प्रवेश प्रतिपूर्ती शुल्क मिळावे
- नवीन इंग्रजी माध्यमाच्या शाळां परवानगी व दर्जा वाढ साठी जागेची अट मग काही निकषांमध्ये शितलता आणणे.
- आश्रम शाळा वेळ पूर्ववत करणे
- इंग्रजी माध्यमातील शाळेतील शिक्षकांना सेवा सुरक्षा व किमान वेतन मिळावे
- पेंढारकर कॉलेज व कोटी कॉलेज, ठाणे जिल्हा व विक्रमगड कॉलेज शिक्षकांना मानसिक त्रास देत आहेत, चौकशी करून प्रशासक नियुक्त करने- ७८
महाविद्यालायांना अनुदान मिळावे - इत्यादी विषयांवर चर्चा केली मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांनी प्रश्न समजून घेऊन संबंधितांना सूचना दिल्या.मीटिंग साठी अनेक संघटनांचे पदाधिकारी वर्षा निवासस्थानी उपस्थित होते.*