माणसात देव शोधण्याचे काम आम्ही सर्व जण करत आहोत – डॉ. मनिलाल शिंपी
मानवसेवा हीच ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून प्रगती मोफत अंध विद्यालय शिक्षण संस्था बदलापुर यांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप!
बदलापुर(स्व.रा.तो) मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचे प्रमुख डॉ.मनिलाल शिंपी यांचा संकल्पनेनुसार, बदलापुर नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री.गोडसे यांच्या वतीने व समाजसेविका सौ.मनिषा कैलास आंबेकर यांच्या सहकार्याने प्रगती मोफत अंध विद्यालय शिक्षण संस्था बदलापुर यांना मदतीचा हात म्हणून नुकताच जीवनावश्यक वस्तूंचे वाटप म्हसकर गुप्ते सभागृह,श्री.जी. मॉल,घोरपडे चौक,भारतीय स्वीट समोर कत्राप बदलापुर पूर्व येथे मोठ्या उत्साह पूर्ण वातावरणात मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपचे प्रमुख तथा आर एस पी कमांडर डॉ.श्री.मनिलाल रतीलाल शिंपी,दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ.श्री.किशोर बळीराम पाटील व विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्राचे लाडके गायक बिग बॉस फेम श्री संतोष चौधरी उर्फ दादुस,भाजपचे बदलापुर शहर अध्यक्ष श्री व सौ.भोईर,यांची मोलाची साथ होती.माणसात देव शोधण्याचे काम आम्ही सर्व जण मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन रंजल्या गांजल्या साठी मदतीचा हात पुढे करून करत आहोत.गणपती मध्ये आम्ही एक वही,एक पेन ही संकल्पना प्रत्यक्षात राबवतो,गुढी पाडव्याच्या दिवशी विट भट्टीवर जाऊन आमरस पुरण पोळी आदिवासी बांधवांना देतो.तर नवरात्री उत्सवाच्या वेळी ज्या महिला नऊरंगाच्या नऊ साड्या नेसायला घेतात व त्या कपाटात ठेवतांना जी साडी खाली पडते ती आम्हाला द्या असे आवाहन करतो. व त्यांनी दिलेली साडी आम्ही शेतावर मोलमजुरी करणाऱ्या हिरकणीला देतो.असे यावेळी मार्गदर्शन करताना मानवसेवा हीच खरी ईश्वर सेवा ग्रुपचे प्रमुख तथा आर एस पी कमांडर डॉ.श्री.मनिलाल रतिलाल शिंपी यांनी सांगितले.
तर संतोष चौधरी उर्फ दादुस यांनी त्यांची लोकप्रिय झालेली गाणी गाऊन उपस्थित सर्व अंध मुलांना व्यासपीठावर नाचवले.त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांची दादुस बरोबर नाचण्याची इच्छा पूर्ण झाली.याच कार्यक्रमाचे औचित्य साधुन चॅरिटी संगीत शो,ध्रुवांश म्युझिकल ग्रुप प्रस्तुत हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम “साथी हाथ बढाना” सादर करण्यात आला.या संपुर्ण कार्यक्रमाचे आयोजन मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा ग्रुपचा माध्यमातून,प्रेरणा घेऊन समाजसेविका सौ. मनिषा कैलास आंबेकर व सौ. पुजा पंडीत यांनी केले होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. हेमचंद्र राजे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ. मनिषा आंबेकर यांनी केले.हा संपुर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. मनिषा आंबेकर,सौ. पुजा पंडीत,हेमचंद्र राजे, संदीप शिंदे, वंगेश गायकवाड,संजय लदवा,रमेश जाधव, गितेश पानसरे,प्रदीप बिडये,सचिन शेडगे,स्वप्नाली कुलकर्णी, संगिता कांबळे,आस्था मांजरेकर,वैशाली पगारे व आदी सर्व सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.