एफ डी ए चे अन्न व औषध निरीक्षक संदीप नरवणे अँटी करप्शन च्या जाळ्यात.
७० हजारची लाच घेताना रंगेहात पकडले!.
ठाणे:कल्याण (मनिलाल शिंपी) ठाणे येथील अन्न व औषध प्रशासनाचे निरीक्षक
संदीप नारायण नरवणे व त्यांना लाच घेण्यास सहाय्य करणारे मेडिकल दुकानदार सुनिल बाळू चौधरी यांना रुपये 70 हजाराची लाच घेताना कल्याण येथील डी मार्ट समोरच्या मोकळ्या जागेत लास्ट लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक
संतोष पाटील यांनी रंगेहात पकडले.
कल्याण येथील पटेल मेडिकल स्टोर या दुकानाचा परवाना मंजूर करण्यासाठी नरवणे यांनी संबंधितांकडून रुपये एक लक्ष मात्र ची रक्कम लाखेच्या स्वरूपात मागितली होती. तोडजोडीअंती रुपये ७० हजार देण्याचे मान्य केल्यावर सदर रक्कम घेताना नरवणे व खाजगी व्यक्ती सुनील चौधरी यांना नवी मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ताब्यात घेतले आहे.या यशस्वी कारवाई साठी, लाच प्रतिबंधक विभाग परिक्षेत्र पोलीस अधीक्षक सुनिल लोखंडे,अप्पर पोलीस अधिक्षक महेश तरडे, अप्पर पोलीस अधिक्षक गजानन राठोड,यांचा मार्गदर्शनाखाली , साफळा पथकातील स. फौ.जाधव, पो.हवा.पवार, पो.नाईक अहिरे,ताम्हणेकर,पो.शिपाई मंगेश चव्हाण, पो.शिपाई चौलकर,मपोना विश्वासराव, मपोना सावंत, मपोना बासरे यांच्यासह पर्यवेक्षण अधिकरि पो.नि.अरुंधती येळवे,लाच प्रतिबंधक विभाग नवी मुंबई ठाणे यांनी अतिशय शिताफीने दुकानदारांची नेहमी कोणत्याही शुल्लक कारणावरून कारवाईची धमकी देऊन पैश्याची मागणी करणाऱ्या अन्न व औषध निरीक्षक संदीप नरवणे यांना कारवाईत त्याचा साथीदार कमिशन एजंट सुनिल चौधरी यांना ताब्यात घेतले आहे. व अश्या प्रकारे मेडिकल चालवणाऱ्या व्यावसायिकांना त्रास देणाऱ्या,आणि पैश्याची मागणी करणाऱ्या इतरही भ्रष्ट अधिकार्यांची चौकशी करण्याची मागणी मेडिकल व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.