लोकन्यूजने नेले अमळनेरचे नाव महाराष्ट्र बाहेर -मंत्री अनिल पाटील
1 min read

लोकन्यूजने नेले अमळनेरचे नाव महाराष्ट्र बाहेर -मंत्री अनिल पाटील

Loading

लोकन्यूजने नेले अमळनेरचे नाव महाराष्ट्र बाहेर -मंत्री अनिल पाटील

वर्धापनदिनी ‘लोक न्यूज ‘वर शुभेच्छांचा वर्षाव…

 

अमळनेर: लोकन्यूज वेब पोर्टलने अल्पावधीतच लोकप्रियता मिळविली आहे. सहा वर्षाच्या दमदार वाटचालीने महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्राच्या बाहेर बातमी पोहोचविण्याचे काम लोक न्यूजने केलेले आहे. सत्य, विवेकी, सात्विक , निर्मळ, संविधानाला, लोकशाहीला पोषक मूल्याची, समाजवाद ,धर्मनिरपेक्षता अशा मूल्याची जाण ठेवून पत्रकारिता केलेली आहे.सर्वच प्रकारच्या बातम्या लावून पडद्यामागील काही लोक ,संस्था यांना समाजाच्या पटलावर आणण्याचे अप्रतिम काम केलेले आहे. पाडळसरे धरण, कृषी धोरण, शैक्षणिक उपक्रम, ज्वलंत समाजातील समस्या, बेरोजगारी, अंधश्रद्धा, भ्रामक कथा यावर प्रबोधनात्मक प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. सामाजिक ,सांस्कृतिक, कला, क्रीडा ,व्यापार, उद्योग, वैद्यकीय, प्रशासकीय , राजकीय घडामोडी निर्णय अशा सर्वच घटकांना प्राधान्य दिलेले आहे. त्याचा सुंदर परिपाक म्हणजे आज निर्माण झालेला असंख्य मित्रपरिवार हितचिंतक याचा हा गोतावळा होय. लोकन्यूजच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कार्यक्रम स्थळी येऊन शुभेच्छा दिल्या. संपूर्ण महाराष्ट्रमध्ये व महाराष्ट्राच्या बाहेर लोकन्यूजचे जाळे मोठे आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात पत्रकार हा एक प्रकारे संघर्ष मधूनच पत्रकारिता करीत आहे त्यांनी माझ्या आमदारकीच्या वेळेला दिलेल्या बातम्यांनी मला मंत्री पदापर्यंत पोहोचविले आहे माझ्या विजयामध्ये लोकन्यूज खारीचा वाटा आहे. परखड , पारदर्शक, विचाराभिमुख लोक न्यूज पोर्टल च्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्राचे राज्याचे पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सुरुवात मंत्री अनिल पाटील यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली . यानंतर अनेक मान्यवरांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी या कार्यक्रमाला मंत्री अनिलदादा पाटील,प्रमुख उपस्थिती खासदार मा. स्मिताताई वाघ, मा.आमदार शिरीष दादा चौधरी,मा.संदीप घोरपडे, मा.भागवत आण्णा,प्रा.अशोक पवार,माधुरी पाटील, मा.के. डी.पाटील,जयवंत आबा पाटील,ॲड.सलीम खान,पोलीस निरीक्षक विकास देवरे,योगेश पाटील,सुभाष पाटील, मकसूद भाई बोरी, वसुंधरा लांडगे,मयूर पाटील,सुनील शिंपी,नरेंद्र चौधरी,बबली भाऊ पाठक,सोमचंद संदानशिव,देवा भाऊ लांडगे,राकेश पाटील,गोरख पाटील,योगेश पाटील,कुसुमाईचे संचालक महेंद्र भाऊ पवार,प्रकाश भाऊ मुंदडा हे राजस्थान गेले असता यांनी भ्रमणध्वनी द्वारे शुभेच्छा दिल्या तसेच पत्रकार संजय वानखेडे, प्रा.डॉ.विजय गाडे,मुन्ना शेख ,चेतन राजपूत,सूर्यवंशी ,नूर खान , सुरेश कांबळे, समाधान मैराळे ,अजय भामरे ,चंद्रकांत पाटील,जयेश काटे ,विनोद पाटील,विजय पाटील,वसंतराव पाटील,आमोल पाटील,ईश्वर महाजन,युवराज पाटील,रोहित भाऊ,राहुल पाटील,बापूराव ठाकरे,पोलीस कॉन्स्टेबल शशिकांत पाटील,जयवंत वानखेडे, उमाकांत ठाकूर ,आत्माराम आहिरे,व समस्त पत्रकार मित्रपरिवार, सूत्रसंचालन “महाराष्ट्र टाईम” वृत्तपत्राचे प्रतिनिधी मिलिंद पाटील दादा यांनी सूत्रसंचालन केले. व कार्यक्रमाची शोभा वाढवणारे राजकीय नेते अधिकारी गण व मित्रपरिवार, पत्रकार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पत्रकार मिलिंद पाटील यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *