
अमळनेरला चिमुकल्या वारकऱ्यांनी घेतले प्रति पंढरपुराचे दर्शन
अमळनेरला चिमुकल्या वारकऱ्यांनी घेतले प्रति पंढरपुराचे दर्शन
अमळनेर प्रतिनिधी
येथील खा शि मंडळ संचलित कै. श्री. रविंद्र साहेबराव पाटील प्राथमिक विद्यामंदिर यांनी आषाढी एकादशी निमित्ताने चिमुकल्यांच्या दिंडीचे आयोजन केले होते.ही दिंडी सखाराम महाराज वाडी संस्थान (प्रति पंढरपूर) येथे नेण्यात आली होती.
यावेळी दिंडीत सहभागी होतांना विद्यार्थ्यांनी ,विठ्ठल रुक्मिणी,विविध संत होऊन वेशभूषा घालून दिंडीत सहभागी झाले होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका स्वप्ना शिसोदे,अनंतकुमार सुर्यवंशी, जागृती प्रभाकर,सुरेखा देसले,बबिता चौधरी, वैशाली साळवे,दिलवरसिंग पाटील,प्रशांत पवार,वैशाली चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.