
ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी
ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी
अमळनेर प्रतिनिधी: ॲड ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलमध्ये देवशयनी आषाढी एकादशी खूप मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्षा ॲड ललिता पाटील, सचिव प्रा श्याम पाटील, संचालक पराग पाटील व प्रा देवेश्री पाटील, प्राचार्य श्री.नीरज चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळेस इ. ३ री ते ७ वी च्या विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाचा पारंपारिक पोषाख धारण करून महाराष्ट्रीयन वारकरी संस्कृतीचे दर्शन घडविले. यावेळी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. त्यात आषाढी एकादशीचे महत्त्व इ. ४ थी च्या विदयार्थ्यांनी त्यांच्या भाषणातून व्यक्त केले. इ.३ री ते ५ वी च्या विदयार्थ्यांनी नाट्य व नृत्य सादर करून भक्त पुंडलिकाची महिमा उत्कृष्टरित्या सादर केली.
टाळ व मृदुंगाच्या गजरात दिंडीचे आयोजन करण्यात आले. अध्यक्ष, संचालक व प्राचार्य यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची पुजा करून विठ्ठल रूख्माईची दिंडी काढण्यात आली.
यावेळी संस्थेच्या अध्यक्षा ॲड ललिता पाटील यांनी आपल्या भाषणातून व गाण्यातून विद्यार्थ्यांना संबोधित केले. व कार्यक्रम यशस्वीतेसाठी चैताली महाजन,राहूल चौधरी,गणेश सातपुते व इतर शिक्षकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विलास पाटील यांनी केले.