
चित्रकार सुनिल दाभाडे यांनी चक्क नारळाचा वापर करुन विठूमाऊली चे चित्र साकारली
चित्रकार सुनिल दाभाडे यांनी चक्क नारळाचा वापर करुन विठूमाऊली चे चित्र साकारली
अनोख्या अशा वेगवेगळे प्रयोग करणारे चित्रकार सुनिल दाभाडे
अनोख्या चित्रकाराची अद्भुत चित्रकला
एक अनोखा उपक्रम
मानव सेवा विद्यालयातील कलाशिक्षक सुनिल दाभाडे यांनी आषाढी एकादशीचे अवचित साधून चक्क नारळावर विठ्ठलाचे सुरेख असे चित्र रेखाटले आहे .
आपल्या हिंदू धर्मात देवांसाठी मानले गेलेले हे श्रीफळ म्हणजे नारळ या * आषाढी एकादशीनिमित्त नारळावर काम केलेले आहे. नारळामध्ये विठ्ठलाचेचे दर्शन घडविले आहे.
हे चित्र तयार करण्यासाठी 17 मिनिट लागले आहे.
अॅक्रीलिक कलरचा वापरकेलेला आहे.
मानव सेवा विद्यालयातील उपक्रमशील शिक्षक,चित्रकार, सुनिल दाभाडे यांनी चक्क
चा वापर करुन शिव जयंती निमित्त भव्य मोजेक पोट्रेट प्रतिभा देखील साकारले आहे.
चित्रकार सुनिल दाभाडे हे नेहमीच काही तरी आगळावेगळा प्रयोग करत असतात.तसेच नाविण्यपूर्ण चित्र काढण्यासाठी सर्वीकडे प्रसिध्द आहेत.त्याचे यापुर्वी सुध्दा अनेक चित्र प्रसिध्द आहे ते असे तव्यावर कवयित्री बहिणाबाई चौधरी चे चित्र,महामानव डा.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधुन 1111शब्दापासून सुरेख चित्र रेखाटले आहे. पाटीवरील सावित्रीबाई फुले यांचे सुंदर चित्र,
नवरात्र उत्सवाचे अवचित साधून चक्क दगडावर देवीचे मनमोहक व आकर्षक असे चित्र रेखाटले नवरात्र निमित्त दगडावर देवीची मनमोहक असे चित्र काढले तसेच याआधी ही त्यांनी वेगवेगळे प्रयोग केले.जसे ज्वारीचा भाकरीवर विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सुंदर चित्र रेखाटले होते. त्या पेंटीगची नोंद ओ.एम.जी नॅशनल बुक रेकॉर्ड व वर्ल्ड रेकार्ड लंडन नवरात्रात चक्क सुपारी वर नऊ दिवसाचे नऊ देवीचे चित्र काढले होते.
कोरोना काळात सुनिल दाभाडे सरांनी चौकाचौकात जाऊन रस्त्यावर कोरोना विषयी चित्र काढुन जनजागृती केले.
असे नवनवीन उपक्रम राबवून चित्रकार सुनिल दाभाडे यांनी आपले व शाळेचे नाव जगाच्या पाठीवर नेले आहे.
यासाठी संस्थेचे अध्यक्ष डॉ. आर.एस.डाकलीया,मानद सचिव विश्वनाथ जोशी ,सर्व पदाधिकारी, सदस्य प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापिका माया अंबटकर ,माध्यमिक मुख्याध्यापिका प्रतिभा सुर्यवंशी, बालवाडी मुख्याध्यापिका मुक्ता पाटील तसेच सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी अभिनंदन केले.
या प्रतिमाची आठवण प्रेरणा ही कलाकृती निरंतर देत राहील अशी भावना चित्रकार सुनिल दाभाडे व्यक्त केली आहे.