
मुंदडा विद्यालयात आषाढी वारीचा सोहळा संपन्न
मुंदडा विद्यालयात आषाढी वारीचा सोहळा संपन्न
स्व सौ.पद्मावती नारायणदास मुंदडा माध्यमिक विद्यालय अमळनेर, श्रीमती पंतप्रधान इंदिरा गांधी विद्यालय अमळनेर,एन टी मुंदडा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय अमळनेर,एम एस मुंदडा प्राथमिक व माध्यमिक विद्यालय अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने सालावादाप्रमाणे आषाढी एकादशी निमित्ताने शाळा ते वाडी संस्थान पर्यंत दिंडी सोहळा मोठ्या उत्साहाने व भक्तिभावाने संपन्न झाला. सर्वप्रथम शालेय प्रांगणात माऊलींच्या पालखिचे पुजन करण्यात आले,विद्यार्थ्यांनी विठठल रुख्माई, व वारकर्यांच्या पारंपारीक वेषभुषा साकारली होती.दिंडी सोहळ्याच्या मार्गात विद्यार्थ्यांनी फुगडी खेळत वारकरी गीतांवर ठेका धरला. ठिकठिकाणी रींगण करत खान्देशचे प्रति पंढरपूर असलेल्या संत सखाराम महाराजांच्या वाडी संस्थान येथे पांडुरंगाच्या दर्शनासाठी पोहोचले. सर्व बालवारकऱ्यांनी पांडुरंगाचे भक्तीभावाने दर्शन घेतले. याप्रसंगी वाडी संस्थानाच्या वतीने पुजारी जयदेव गुरुजी, ह.भ.प जोशी गुरुजी व ह.भ.प शारंगधर महाराज यांनी दिंडीचे शाल श्रीफळ देऊन दिंडीचे स्वागत केले. ह.भ.प शारंगधर महाराज यांनी वाडी संस्थानची माहिती सांगुन उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना आषाढी वारीचे महत्व सांगितले. विद्यार्थ्यांनी मोठ्या भक्ती भावाने पांडुरंगाच्या नावाचा जयघोष केला ,माऊलींच्या पसायदानाने वारीची सांगता झाली.यावेळी शाळेतर्फे व वाडी संस्थांतर्फे विद्यार्थ्यांना अल्पोपहार व खाऊ देण्यात आला शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी यांचे यशस्वितेसाठी सहकार्य लाभले