
अमळनेर तालुका मुख्याध्यापक संघाची तालुका कार्यकारणी घोषित..
अमळनेर तालुका मुख्याध्यापक संघाची तालुका कार्यकारणी घोषित..
अध्यक्षपदी तुषार बोरसे, उपाध्यक्षपदी सुनील पाटील तर सचिवपदी आर. बी पाटील यांची वर्णी
अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष श्री तुषार नारायण बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली दि.17/7/2024 रोजी साने गुरूजी विद्यालय अमळनेर येथे मुख्याध्यापक संघाची कार्यकारिणी गठीत करण्यात आली त्यात श्री सुनिल चुडामण पाटील-उपाध्यक्ष (साने गुरूजी विदयालय अमळनेर) श्री आर बी पाटील-सचिव (नविन माध्यमिक विदयालय अंतुर्ली.) श्री अनिल चौधरी-मार्गदर्शक ( नंदादीप माध्यमिक विदयालय निंब ) श्री आसाराम दौलत सैदाणे -कार्यकारिणी सदस्य (अनु.जाती -जमाती) सौ.सिमा सुरेन्द्र सुर्यवंशी-महिला प्रतिनिधी (दौ.रा.कन्या शाळा अमळनेर), श्री बापु बन्सीलाल चव्हाण -सदस्य (आदर्श विदयालय मांडळ), श्री लक्ष्मीकांत सैंदाणे- सदस्य ( सु.ही.मुंदडे मारवड) यांची निवड करण्यात आली बैठकीला श्री जे. डी अहिरे,श्री डी.डी जाधव सर इतर मुख्याध्यापक उपस्थित होते.
सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे
अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.