
पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे आषाढी एकादशी जल्लोषात साजरी
पर्ल इंटरनॅशनल स्कूल अमळनेर येथे आषाढी एकादशी जल्लोषात साजरी
भारतीय संस्कृती व परंपरेतील सर्व धर्म समभाव याचा प्रतीक असलेला एक उत्सव सण म्हणजे आषाढी एकादशी होय त्याच पावन परवाच्या निमित्ताने पर्ल इंटरनॅशनल स्कूल चे आदरणीय चेअरमन चंद्रकांत भदाणे सर यांच्या हस्ते विठ्ठल-रखुमाईची पुजा करण्यात आली. यावेळी प्राचार्या यांनी आषाढी एकादशी चे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले. सर्व विद्यार्थ्यी व विद्यार्थीनीनी वारकरी संप्रदायचा पोषाख परिधान करून विदयार्थ्यांनी नाट्य व नृत्य सादर केले.टाळ व मृदुंगाच्या गजरात दिंडीचे प्रस्थान करण्यात आले. यामुळे महाराष्ट्राची संस्कृती सर्वांना पाहावयास मिळाली. यावेळी संस्थेचे चेअरमन प्रा.चंद्रकांत भदाणे, सचिव सौ. गायत्री भदाणे मॅडम सर्व संचालक,याची प्रमुख उपस्थितीत लाभली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी प्रज्ञा पाटील मॅडम, यांनी केले, कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री विजय चौधरी सर, मनस्वी भदाणे मॅडम , विशाखा देसले मॅडम, कुंजल पाटील मॅडम, श्री सखाराम पावरा, श्री उमेश पाटील, राजू पाटील यांनी सहकार्य केले.