
अमरीश टेकडीवरील यात्रेमध्ये, यात्रेकरू व नागरिकांनी केली अस्वच्छता… पर्यावरण प्रेमी व टेकडीवरील गृपमध्ये संताप
अमरीश टेकडीवरील यात्रेमध्ये, यात्रेकरू व नागरिकांनी केली अस्वच्छता…
पर्यावरण प्रेमी व टेकडीवरील गृपमध्ये संताप
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
जिथे स्वच्छ राहून शरीर निरोगी राहते, तिथे शरीर आणि मन दोन्हीच्या आनंदासाठी स्वच्छता आवश्यक असते. स्वच्छता, सर्व लोकांनी त्यांच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये समाविष्ट करणे आवश्यक आहे. महात्मा गांधी म्हणाले होते – ‘स्वच्छता ही सेवा आहे. आपल्या देशासाठी आपल्या जीवनात स्वच्छतेची नितांत गरज या व्यक्तीप्रमाणे अमळनेर येथील टेकडी ग्रुप वरील सर्व सदस्य स्वच्छता व पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन करीत आहेत..काल टेकडीवर यात्रा होती..
तालुक्यातील बंधू-भगिनी यांनी यात्रेचा आनंद घेतला, आनंद घेतांना आपल्याकडून अस्वच्छता होत आहे याचे ते भान विसरले आणि सर्व टेकडीवर
अस्वच्छता करीत टेकडीवरील ग्रुप सदस्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी काम लावून दिले याचा तीव्र संताप ग्रुप सदस्यांनी केला आहे. यात्रेचा लोकांनी आनंद घेतलाच पाहिजे पण आपल्याकडून अस्वच्छता होणार नाही याचे भान सर्वानी ठेवले पाहिजे पण ते विसरतात…
सविस्तर माहिती कशी कि काल अंबरीश टेकडी वर दर वर्षा प्रमाणे यात्रा आनंदात पार पडली ही एक निसर्ग यात्रा असते .यात्रा म्हंटले की आनंद उत्साह हे सारेच पण हे करत असताना आम्हीं टेकडी ग्रुप वारंवार आवाहन वजा सूचना करीत असतो की हे रान आपण साऱ्यांनी चाळीस हजार वृक्ष लाऊन संवर्धन करून जगवली आहेत..
पशु पाखरे वास्तव्यास आहेत शुध्द हवा घेणे साठी पहाटे येथे खूप लोक फेरफटका मारतात .एवढ्या सूचना आवाहन करून देखील आज सकाळ ची ही अंबरीश टेकडी चे असे चित्र टेकडीवरील ग्रुप मधील सदस्यांनी पाहिले ते आवक झाले..सुचत नाही प्रचंड संताप राग
आपण सुजाण नागरिक आहात तुम्हीचं बघा हे वास्तव मग ही आवर सावर या टेकडी ग्रुप च्या मावळ्यांनी चं करावी का?
एक साधा प्रश्न मला तुम्हां साऱ्यांना सतावत राहील.. असे टेकडीवरील ग्रुप सदस्यांनी बोलून दाखवले…
सकाळपासूनच सर्व टेकडीवरील ग्रुप सदस्यांनी हजारो क्विंटल कचरा गोळा करत तो नष्ट केला…