
संस्कारातून ज्ञान मिळवा- डी.वाय.एस.पी सुनिल नांदवाळकर यांचे प्रतिपादन
संस्कारातून ज्ञान मिळवा-
डी.वाय.एस.पी सुनिल नांदवाळकर यांचे प्रतिपादन
————————————————-
अमळनेर :- येथिल प्रताप कॉलेजमध्ये गुरू पौर्णिमा निमित्त सर्व गुरुजनांचा प्रति आदरभाव व्यक्त करत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अमलनेरचे पोलीस उप अधिक्षक सुनिल नांदवाळकर यांनी रस्ते अपघात व स्वतः च्या मालमत्तेचे रक्षण कसे करावे या संबंधी विस्तृतपणे भूमिका स्पष्ट केले.
दिनांक २२ जुलै २०२४ रोजी पूज्य साने गुरुजी सभागृहात पार पडलेल्या जण जागृती कार्यक्रमात प्रारंभी प्रताप महाविद्यालयाच्या उपस्थित सर्व प्राध्यापक गुरू जणांचे सत्कार मा.सुनिल नांदवाळकर,पोलीस निरीक्षक विकास देवरे,पोलीस उप निरीक्षक ईंगळे मॅडम,पोलीस कर्मचारी जरे मॅडम,खा.शि.मंडळाचे जेष्ठ संचालक डॉ.अनिल शिंदे,प्राचार्य डॉ.अरुण जैन,
यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्राचार्य डॉ.अरुण जैन यांनी महाविद्यालयात राबविलेले उपक्रम,राष्ट्रीय शैक्षणिक धोरण,नो व्हेहीकल डे या संबंधी आपले मत केले आणि कार्यक्रमाच्या मागची भूमिका स्पष्ट केले.
मा.सुनिल नांदवाळकर यांनी गुरुजन व विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रामुख्याने पीपीटी द्वारे दोन घटकांवर भर दिले.पहिले,विद्यार्थ्यांनी नेहमी सत्याची कास धरावी व ज्ञानात वृद्धी करावे ,आदर्शवत नागरिक बनावे,रस्ते अपघात टाळण्यासाठी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे,१८-३५ वयोगटातील तरुणांनी सावध राहून हेल्मेट सह व्हेहिकल चालवावे,हवामान विषयक घटक समजून घ्यावे,विद्यार्थी दशेत सुद्धा लाल सिग्नल असते त्याची पालन करावे,रिल्स व रेशिंग बंद करावे,अपघात झाल्यानंतर गोल्डन पिरियड मध्ये रुग्णालयात दाखल करावे,स्वतः वचन बद्ध व्हावे.
आपल्या दुस-या पीपीटी सादरीकरणात नांदवळकर साहेब म्हणाले की,आपण स्वतः आपल्या मालमत्तेची काळजी घ्यावी, आक्षेपार्ह मजकूर सोशल मीडियावर व्हायरल करू नये,डॉयल ११२ ही नविन सेवा सुरू झाली त्याचा लाभ सर्वांनी घ्यावे अशा विविध प्रकारच्या सूचना व नव माहिती दिली.
या नंतर जेष्ठ संचालक डॉ.अनिल शिंदे यांनी सुद्धा आपण सर्व प्रकारचे भेद विसरून मानवतावादी कार्यास वाहून घेणे आवश्यक आहे असे सांगून उपस्थित सर्व गुरुजना बद्दल आदरभाव व्यक्त केले.
या प्रसंगी संस्थेचे सह सचिव डॉ.धिरज वैष्णव,उप प्राचार्य डॉ.कल्पना पाटील,डॉ.अमित पाटील,डॉ.व्ही बी मांटे, डॉ.वाय.व्ही.तोरवणे तसेच डॉ.भरतसिंग पाटील,डॉ.अशोक पाटील,प्रा.हर्षवर्धन जाधव, प्रा.कुबेर कुमावत,प्रा.तुषार रजाळे,डॉ.मिलिंद ठाकरे,प्रा.एस.बी.नेरकर,डॉ.एन.एस पवार,डॉ.अमोल मानके,ग्रंथपाल दिपक पाटील,डॉ.नलिनी पाटील,प्रा.वृषाली वाकडे,प्रा.पुष्पा पाटील,प्रा.वैशाली राठोड,प्रा.भाग्यश्री जाधव,डॉ.वंदना भामरे, डॉ.आर सी सरवदे,डॉ.माधव भुसनर,प्रा.शशिकांत जोशी,डॉ.मुकेश भोळे,प्रा.निलेश चित्ते,डॉ.रवि बाळसकर,
डॉ.जितेंद्र पाटील,प्रा.विजय साळुंखे,प्रा.जयेश साळवे,डॉ.महेंद्र महाजन,डॉ.ज्ञानेश्वर मराठे,डॉ.रविंद्र मराठे,प्रा.ज्ञानेश्वर कांबळे,प्रा.रोहन गायकवाड,प्रा.नितेश कोचे,डॉ.किरण सूर्यवंशी,डॉ.विवेक बडगुजर,प्रा.देवेंद्र तायडे,प्रा.बापू संदानशिव,प्रा.स्वप्निल पवार,प्रा.सुनिल राजपूत,डॉ.रमेश माने,डॉ.किरण गावित,डॉ.अनिल झळके,प्रा.नितीन पाटील,प्रा.अवित पाटील,क्रीडा संचालक डॉ.सचिन पाटील,डॉ.प्रदीप पवार,प्रा.दिलीप तडवी,डॉ.राखी घरटे,प्रा.हर्षल सराफ,प्रा.सचिन आवटे,प्रा.भोजराज पाटील यांच्या सह अनेक प्राध्यापक बंधू-भगिनी उपस्थित होते.
प्रस्तुत कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.अरुण जैन,डॉ.धिरज वैष्णव,डॉ.अमित पाटील,दिपक चौधरी,महेश मोरे यांनी सहकार्य केले तर सूत्र संचालन व आभाराचे कार्य उप प्राचार्य डॉ.विजय तुंटे यांनी पार पाडले.