भुसावळ तालुका शालेय मुलांच्या 14 व 19वर्षा आतील फुटबॉल स्पर्धा संपन्न.
सेंट अलाॅयसेस हायस्कूल व डि.एल. हिंदी विद्यालय विजयी . भुसावळ -महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या मान्यतेने व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ व तालुका क्रीडा अधिकारी कार्यालय, व बियाणी मिलिटरी स्कूल द्वारा आयोजित शालेय 14व19वर्षा आतील मुलांच्या फुटबॉल स्पर्धा बियाणी मिलिटरी स्कूलच्या मैदानावरती उत्साहात संपन्न झाल्या. स्पर्धेचे उद्घाटक महेशजी वाघमोडे मुख्याधिकारी नगरपरिषद भुसावळ हे होते यांच्या हस्ते क्रीडांगण पूजन करून श्रीफळ फोडून स्पर्धेचे उद्घाटन केले. बियाणी मिलिटरी स्कूल चे प्राचार्य डी एम पाटील , महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष, भुसावळ तालुका समन्वयक डॉ प्रदीप साखरे , तांत्रिक समिती सदस्य मेघाश्याम शिंदे, प्रा. मनोज वारके, हिम्मत पाटील, यांच्यासह तालुक्यातील क्रीडा शिक्षक व खेळाडू प्रशिक्षक उपस्थित होते. उद्घाटन पर भाषणामध्ये महेश वाघमोडे यांनी विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबर खेळांना महत्व दिले पाहिजे खेळामुळे आपला शारीरिक मानसिक व सर्वांगीण विकास होत खेळामुळे आपल्याला पाच टक्के आरक्षणामध्ये क्लासवन अधिकारी होता येते. खेळामध्ये आपल्याला करिअर सुद्धा करता येते आत्ताच ऑलम्पिक स्पर्धा सुरू आहे यात भारताला शूटिंग मध्ये मेडल प्राप्त झालेले आहे. या स्वतःचे नाव तर उज्वल करता येते परंतु देशाचे नाव सुद्धा आपल्याला ऊंच करता येते. त्यामुळे खेळ हा सांघिक भावनेने खेळा. स्पर्धा सुरू असताना अचानक जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक यांनी स्पर्धेला भेट दिली. स्पर्धा अतिशय चांगल्या पद्धतीने होत असल्याबद्दल त्यांनी भुसावळ तालुका समन्वयक डॉ प्रदिप साखरे वआयोजकांचे तसेच क्रीडा शिक्षक व खेळाडूंचे कौतुक केले. व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. त्यांच्यासोबत तालुका क्रीडा अधिकारी मीनल थोरात हे होते. यात 14 वर्षातील मुलांचा अंतिम सामना सेंटअलाॅयसेस हायस्कूल भुसावळ विरुद्ध ताप्ती पब्लिक स्कूल यांच्यात झाला. यात सेंटअलाॅयसेस हायस्कूल4/0ने विजयी झाले . 19 वर्षे वयोगटातील सामना डि.एल. हिंदी विद्यालय विरुद्ध पु.ओ. नाहाटा कॉलेज भुसावळ यांच्यात झाला या अटीतटीच्या सामन्यात अटीतटीच्या सामन्यांत डि.एल. हिंदी विद्यालय विजयी झाले. पंच म्हणून अनस शेख, रेहान शेख,, सादिक शेख आयान शेख, अलेस्टर सिमोंस, तोसिफ कुरेशी, हिम्मत पाटील ,यांनी काम पाहिले . स्पर्धेसाठी तांत्रिक सदस्य म्हणून समन्वय डॉ. प्रदीप साखरे, तांत्रिक सदस्य मेघश्याम शिंदे , प्रा. मनोज वारके यांनी काम बघितले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघश्याम शिंदे यांनी केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी, कोळी सर, अर्जुन सणस, याकुब शेख, यांच्यासह बियाणी मिलिटरी स्कूलचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.