• Tue. Jul 8th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

रोटरी क्लब अमळनेर 69 वा पदग्रहण समारंभ अमळनेर रोटरी क्लब च्या नूतन पदाधिकाऱ्यांचा 69 वा पदग्रहण सोहळा

Aug 5, 2024

Loading

रोटरी क्लब अमळनेर 69 वा पदग्रहण समारंभ

अमळनेर रोटरी क्लब च्या नूतन पदाधिकाऱ्यांचा 69 वा पदग्रहण सोहळा

अमळनेर प्रतिनिधी

रोटरी वर्षा 2024-25 साठी दि. 4 ऑगस्ट 2024 रोजी रविवारी सायंकाळी 7.00 वाजता बन्सीलाल पॅलेस अमळनेर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाचे विषेश आकर्षन व प्रमुख वक्ते म्हणून पुणे येथिल PRA फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा व 41 मतिमंद मुलांच्या माता डाॅ.सौ.प्राजक्ता कोळपकर , DGN रो.डाॅ. राजेश पाटील व चाळीसगाव येथिल असिस्टंट गव्हर्नर रो.डाॅ.संदिप देशमुख, असिस्टंट गव्हर्नर रो.अभिजीत भांडारकर मंचावर उपस्थित होते. तसेच रोटरी डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी रो.डाॅ. जुगल चिनारीया,रोटरी क्लब चोपडा, रोटरी क्लब चाळीसगाव राॅयल्स व अमळनेर येथील पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
अमळनेर रोटरी क्लब चे नूतन अध्यक्ष रो.ताहा बुकवाला व मानद सचिव रो.विशाल शर्मा यांनी मावळते अध्यक्ष रो.प्रतिक जैन व सचिव रो. देवेंद्र कोठारी यांच्याकडून पदभार स्विकारला. तसेच या वर्षाची नविन बोर्ड ऑफ डायरेक्टर यांना पदभार देण्यात आला व रोटरी समाचार पत्रक “सेवाचक्र ” चे विमोचन करण्यात आले व Rotary Literacy Mission अंतर्गत रू. 10000/- चे Education Kit मागवून हुशार व गरजु विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे.
या प्रसंगी मावळते अध्यक्ष रो.प्रतिक जैन यांनी मागील वर्षातील रोटरी ने केलेल्या विवीध कार्याचा आढावा वाचून दाखवला. यात रोटरी ने केलेले कार्य व संस्कृती बद्दल दिली. त्यानंतर नवनिर्वाचित अध्यक्ष रो ताहा बुकवाला यांनी आपले मनोगत व्यक्त केले. असिस्टंट गव्हर्नर रो.डॉ.संदीप देशमुख यांनी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर यांचा संदेश वाचून दाखविला. तसेच सालाबादाप्रमाणे महाविद्यालयात आपल्या विभागात प्रथम विद्यार्थ्यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
प्रमुख वक्ते रो.डाॅ. राजेश पाटील यांनी रोटरी ची मैत्री जगाच्या कल्याणासाठी सतत कार्यरत असते. या जगातून पोलिओ चे निर्मूलन करण्यात रोटरी ला यश आले आहे.
प्रमुख वक्ते डॉ.सौ.प्राजक्ता कोळपकर यांनी मतिमंद मुलांच्यां संगोपन आणि स्वावलंबना साठी त्या करीत असलेल्या कार्यातील आगळे वेगळे अनुभव सांगितले. आभार प्रदर्शन नूतन सचिव रो विशाल शर्मा यांनी केले व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ शिल्पा सिंघवी आणि रो अजय रोडगे यांनी केले.
कार्यक्रमाचा समारोप सौ पुर्वा वशिष्ट यांनी पसायदान गाऊन केला.

असे आमंत्रक अध्यक्ष रो.प्रतिक जैन
क्लब सेक्रेटरी रो.देवेद्र कोठारी यांनी कळवले.

स्मशानभूमीत अघोरी कृत्य करून महिलांच्या फोटोवर काळी जादू, दोन तरुणांना ठोकल्या बेड्या (ठाण्यातील एका स्मशानभूमीत महिलांच्या फोटोवर काळी जादू करतानाचा दोन तरूणांचा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर त्यांना पोलिसांनी अटक केली.)
आमदार अनिल पाटलांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त सर्व स्तरातून झाला शुभेच्छांचा वर्षाव मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्रीसह राज्य भरातील नेत्यांनी दिल्यात शुभेच्छा, विविध समाजपयोगी कार्यक्रमांनी रंगला सोहळा
भक्तिरसात न्हालं संत गजानन महाराज मंदिर आषाढी एकादशीला उत्साहाची लहर!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed