• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

मालपुर येथे पशुसंवर्धन विभाग आणि रिलायन्स फाऊंडेशन तर्फे पशु आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

Aug 9, 2024

Loading

मालपुर येथे पशुसंवर्धन विभाग आणि रिलायन्स फाऊंडेशन तर्फे पशु आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

मालपुर- रिलायन्स फाऊडेशन,धुळे व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 08 ऑगस्ट 2024 रोजी मालपूर तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथे पशुचिकित्सा व लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिरामध्ये पशुचे लसीकरण,वंध्यत्व निवारण, गोचीड व्यवस्थापन त्यानंतर गर्भधारणा तपासणी तसेच मोफत औषध वाटप करण्यात आले, विविध प्रकारचे महत्त्वपूर्ण असे तपासण्या उपचार या ठिकाणी केले तसेच . या कार्यक्रमांमध्ये चिकित्सक म्हणून डॉ.संकेत पुपलवार, पशु तज्ञ पी.यु. चव्हाण,रवींद्र निकम,हर्षल मराठे पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय टीम यांनी जनावरांना ट्रीटमेंट दिली या कार्यक्रमांमध्ये रिलायन्स फाउंडेशन आणि पशुसंवर्धन विभाग तर्फे जनावरणच्या आरोग्याच्या हेतूने महत्वाची अशी औषधी या कार्यक्रमाच्या वेळी पुरविण्यात आली तसेच गावातील दुधाळ जनावरांना सेवा देण्यात आली तसेच सर्व पशुपालक बंधूंनी कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. कार्यक्रमाचे आयोजन रिलायन्स फाऊंडेशन चे जिल्हा व्यवस्थापक नितीन कोल्हे तसेच पशुपालक दामोदर विठ्ठल माळी,कैलास माळी यांनी परिश्रम घेतले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *