• Sun. Jul 6th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

नवीन दुर्मिळ वनस्पती प्रजातीस शिवाजी महाराजांचे नाव…

Aug 10, 2024

Loading

नवीन दुर्मिळ वनस्पती प्रजातीस शिवाजी महाराजांचे नाव…

कोल्हापूर येथील न्यू कॉलेज महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाचे संशोधक विद्यार्थी रतन मोरे, अक्षय जंगम व डॉ. निलेश पवार यांनी ऑगस्ट 2023 मध्ये विशाळगडावर कंदीलासारखा आकार असणाऱ्या ” कंदील पुष्प ” (Lantern Flower) या वर्गातली एक दुर्मीळ प्रजाती शोधून काढली.
भारतातील कंदील पुष्प या वर्गाचे तज्ञ अभ्यासक डॉ. शरद कांबळे यांनी या वनस्पतीचा सखोल अभ्यास केला असता ही एक नवीन असल्याची शक्यता व्यक्त केली. त्यानंतर वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. एस. आर. यादव ज्यांनी आजवर या वर्गातील (Genus) 6 नवीन प्रजाती ( species) शोधून काढल्या आहेत, त्यांनी अंतिम निरीक्षण करून ही वनस्पती नवीन प्रजाती म्हणून मान्य होवू शकेल यावर शिक्कामोर्तब केले. या वनस्पतीचा सखोल अभ्यास करून त्यासंदर्भातील शोधनिबंध (Research paper) न्यूझीलंड येथून प्रकाशित होणाऱ्या फायटोटॅक्सा ( Phytotaxa) या आंतरराष्ट्रीय वनस्पती शोध नियतकालिकात ( International Journal) नुकताच दि. 06 ऑगस्ट 2024 रोजी प्रकाशित झाला.
या नवप्रजातीचे सेरोपेजिया शिवरायीना (Ceropegia shivrayiana, Family: Apocynaceae, Ceropegieae) असे नामकरण करून या संशोधकांनी शिवाजी महाराजांच्या प्रती आपला आदर व्यक्त केला आहे. सदर प्रजाती विशाळ गडावर मर्यादित प्रमाणात जरी आढळून असली तरी आजूबाजूच्या परिसरात देखील ती आढळून येण्याची शक्यता आहे असे संशोधकांचे मत आहे.
सदर नवप्रजाती ही औषधनिर्माण, वैद्यकीय, आयुर्वेद व रसायनशास्त्र या संशोधनपर अभ्यासक्रमांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरू शकते. त्यात असलेली वेगवेगळी रसायने (Chemical constituents) व त्यांच्या अंगी असलेली औषधी उपयुक्तता ( Biological activities ) यावर भविष्यात सखोल अभ्यास होवू शकतो.

संकलन:
प्रा. रविंद्र गंगाराम माळी
विभाग प्रमुख (डी. फार्मसी)
खा. शि. मंडळाचे पंढरीनाथ छगनशेठ भांडारकर कॉलेज ऑफ डि. फार्मसी व प्रा. र. का. केले कॉलेज ऑफ बी. फार्मसी, अमळनेर , जि. जळगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *