नूतन ज्ञान मंदिर शाळेचे आर एस पी व स्काऊट गाईड बालसैनिकाचा वतीने रक्षाबंधन. उत्साहात साजरा
भारतीय संस्कृती जपण्यासाठी आर एस पी युनिट व स्काऊट गाईड पथकाची मोलाची भूमिका-सौ. मिनाक्षी गागरे.
ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी) नुतन ज्ञान मंदिर कल्याण पूर्व शाळेचा मुख्याध्यापिका सौ.मिनाक्षी गागरे मॅडम यांचा मार्गदर्शनाखाली, सांस्कृतिक प्रमुख सौ.मोटघरे मॅडम सौ.आव्हाड मॅडम स्काऊट गाईड प्रमुख सौ.वाबळे, सौ.परदेशी मॅडम,यांच्यासह शाळेतील आर एस पी बालसैनिक पथक, व स्काऊट अँड गाईड युनिट चा विद्यार्थ्यांनी, आर एस पी अधिकारी श्री. सुनिल कोळी, व श्री.गोकुळ गवळे यांच्या नेतृत्वाखाली कोळशेवाडी पोलीस स्टेशन विठ्ठलवाडी. वाहतूक पोलिस उपशाखा,चक्की नाका ,बाजारपेठ पोलिस स्टेशन, वृद्धाश्रम या ठिकाणी पोलीस बांधवांना व वृद्धाश्रमातील -आजोबांना राखी बांधून रक्षाबंधन दिन आनंदात साजरा केला. या नावीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल आर एस पी अधिकारी युनिटचे तसेच आर एस पी बालसैनिकांचे आणि स्काऊट गाईड पथकाचे कौतुक आणि अभिनंदन करण्यात येत आहे. रक्षाबंधन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी विशेष परिश्रम घेतले.