२१ ऑगस्ट रोजी, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाचा लाक्षणिक संप व सकाळी १० वाजल्यापासून, आझाद मैदानावर निदर्शने!
मुंगसे , ता. अमळनेर दि. २० (वार्ताहर ) -*
*मानधन वाढ, दरमहा पेंशन, ग्रेच्यूईटी व इ. प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी, अंगणवाडी कर्मचारी जुलै महिन्यापासून, मासिक अहवाल न देणे, शासकीय बैठकीत बहिष्कार टाकण्याचा आंदोलन सुरू केले आहे. तसेच दिनांक १२ ऑगस्ट पासून अंगणवाडी कर्मचारी आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. तरी सुद्धा शासन व प्रशासन अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्या बाबतीत दुर्लक्ष करीत आहे*.
*आपल्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी अंगणवाडी कर्मचारी दिनांक २१ ऑगस्ट रोजी, एक दिवसाचा लाक्षणिक संप करून, आझाद मैदानावर सकाळी १० वाजल्यापासून, प्रचंड निदर्शने करणार आहेत. या निदर्शनास मुंबई, पालघर, ठाणे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी १०० टक्के भागीदारी करावी. असे आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे*.
*अंगणवाडी कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी संघटना प्रयत्नशील असून, काही नागरी प्रकल्पात जाणुन बुजुन, सभा बोलाविण्यात आली आहे.या सर्व सभेत बहिष्कार टाकून, मुंबई जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी कर्मचारी, सकाळी १० वाजता, आझाद मैदानावर जमावे असे आवाहन करण्यात आले आहे*.
आपले विश्वासू
*एम . ए . पाटील, अध्यक्ष . बृजपालसिंह सरचिटणीस ,सुर्यमणी कार्याध्यक्ष . गायकवाड, रश्मी म्हात्रे, निलेश दातखिळे, राजेश सिंह,भगवान दवणे,दिनकर म्हात्रे,विष्णू आंब्रे,
सतीश चौधरी असे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने संघटक सचिव भानुदास पाटील जिल्हाध्यक्ष सुषमाताई चव्हाण यांनी जळगांव जिल्ह्याच्या वतीने कळविलेले आहे* .