• Mon. Jun 16th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत जळोद पीएम. श्री. जि प शाळेचे यश…

Aug 24, 2024

Loading

तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत जळोद पीएम. श्री. जि प शाळेचे यश…

दि.23व 24 ऑग.2024 या कालावधीत प्रताप कॉलेज अमळनेर येथे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न झाले. या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत 14 वर्षा खालील वयोगटातून जळोद जि प शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
65kg वजन गटातून खुशाल सोनवणे,58kg गटातून जयश्री भोई, तर 40kg गटातून वैष्णवी कोळी हे विद्यार्थी तालुक्यातून प्रथम आले तर शिवाजी वैदू हा विद्यार्थी 40kg गटातून उपविजेता ठरला.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अध्यक्ष शा. व्य. स. व सदस्य, मा. सरपंच व ग्रा प सदस्य आणि सर्व जळोद ग्रामस्थ त्याच बरोबर मुख्या. व शिक्षक यांनी त्यांचे व शाळेतील शिक्षक ज्ञानेश्वर कुवर यांचे कौतुक करून अभिनंदन केले तसेच जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *