• Fri. Jul 4th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

हरतालिका स्त्री पुरुष समर्पणाचे प्रतिक!!!

Sep 6, 2024

Loading

हरतालिका स्त्री पुरुष समर्पणाचे प्रतिक!!!

भारत देशात सण उत्सव,व्रत याची उत्तम परंपरा आहे. ही परंपरा फारच प्राचीन आहे. आर्य भारतात येण्यापूर्वी येथे सिंधू संस्कृती गुण्यागोविंदाने नांदत होती. श्रमण संस्कृती जिला कृषी संस्कृती म्हणतात अशी शेतीवर प्रयोग करणारी सुंदर संस्कृती होती. मातृसत्ताक पध्दती रुजलेली होती. स्त्री पुरुष समानतेने जीवन जगत असत. आर्य आल्याने त्यात पुरुषसत्ताक पध्दतीचा बदल केला. जैन, बुध्द, महानुभाव पंथात स्त्री ला देवाच्या आराधना करतांना समतेचा वापर झाला.स्त्रीलाचा विटाळ मानणारा हिंदु धर्म उभा करण्यात आला. प्राचीन काळातील पात्र भगवान शंकर हे मुळनिवासी नायक होते. कृषी संस्कृतीशी नात सांगणारा महादेव हे बहुजनाचे नायक होते. गणसंस्कृती जोपासणारा शिव हा महानायक..काही अलिखीत कथा असलेले नायक होऊन गेले. त्यांचा अर्थ प्राच्यविदया पंडित शरद पाटील यांनी योग्य संशोधनाअंती निष्कर्ष काढला. पुर्वी म्हणजे सिंधु संस्कृतीत स्त्री पुरुष भेद नव्हता. नंतर मात्र असंख्य जाती निर्माण होऊन मूळ संस्कृतीवर आघात झाला. काही प्राचीन साहित्यिकांनी बुध्दाच्या जातक कथेतुन काही गोष्टी वेगळया पध्दतीने मांडल्या. मुळ नायक चमत्कारीक गोष्टीत बसविले. महादेव म्हणजे शिव त्यावर हरतालिकेची कथा आहे. शिव प्राप्त होण्यासाठी पार्वतीने केलेली आराधना हे हरतालिकेचे उदाहरण आहे. हरतालिका म्हणजे हर ला प्राप्त करणारी तालिका म्हणजे स्त्री असा अर्थ घेतला जातो. स्त्री पुरुष हे एकमेकासाठी कसे समरस असावे यासाठी ही कथा आहे. पार्वतीचे शिवावरील प्रेम हे ह्या कथेचे सार दिसते. कुमार वयापासून शिवाची आराधना करणारी पार्वती ही आपल्या इसिप्त प्राप्ती साठी उपवास करते. तिला शिव मिळतो. पार्वतीच्या वडिलांना नारद सांगतो की विष्णू तिला मागणी करित आहे. विष्णू हा पार्वतीला योग्य वर आहे परंतू पार्वती ही निष्ठावान स्त्रीचे प्रतिक तिने विष्णू शी विवाह न करता शंकराला आपला पती मानले. कधी कधी स्त्रीला वर निवडण्याचे स्वातंत्र्य मिळत नाही. ह्या आधुनिक युगात युवतीना संधी मिळू लागली आहे. पार्वतीने तिच्या आवडीच्या पुरुषाला निवडले. वडीलांनी तिला मान्यता दिली. पार्वतीने आपल्याला आवडीच्या वराला समर्पित केले. स्वयंवर ही परंपरा मातृसत्ताक पध्दतीची देणगी आहे. ह्या दिवशी कुमारिका व स्त्री ह्या योग्य वर निवडण्यासाठी देवाला म्हणजेच वडाच्या झाडात शंकराला मानून म्हणजे योग्य पुरुष आयुष्यात येण्याची आराधना करतात. स्टीफन हाॅकींग याने तर सृष्टीत देव नाकारला. त्याचे संशोधन हे उच्च प्रतीचे संशोधन आहे. परंतु स्त्रीला तिच्या आवडीच्या वराला निवडणे हा चांगला उद्देश आहे. व्रत हे अंधश्रद्धेपासून लांब राहिले पाहिजे. उपवासाचा खरा अर्थ उप म्हणचे जवळ व वास म्हणजे राहणे. सतत चांगल्या विचारात स्वतःला ठेवणे हा खरा उपवास आहे. देव हा सद्गुणांचा पुतळा मानत असू तर त्याचे अनुकरण करणे उपवास होय. नियमित शरीर प्रमाणापेक्षा जास्त अन्न खात असेल तर त्याला एक दिवस कमी खाऊन विश्रांती देणे हा उपवासच आहे. खरे पाहता वृत्तीत बदल हा उपवास आहे. पार्वती ही वरील उपवासाचे उदाहरण आहे. त्यासाठी फलाहार सांगितला आहे. आपण मात्र फराळ करतो तोही पुर्ण पोट भरेपर्यंत करतो. जगात अनेक मेहनत करणारे लोक आहेत त्यांना उपवास जो शरिरासाठी करतो तो शक्य नाही ते जीवनात चांगले विचार आणून उपवास करतील ही आशा आहे. प्रत्येक धर्मात उपवासाच्या विविध पध्दती आहेत. पुढील जन्मी हाच पती मिळो अशी अपेक्षा असली तरी विज्ञान पुनर्जन्म मानत नाही. विज्ञान मानणारांनी हाच जन्म आपल्या जीवलगासाठी उत्तम पध्दतीने जगावा ही हरतालिका च होय. शिव व पार्वती चे अर्धनटनारी चित्र दाखविले जाते याचा अर्थ ते एकमेकांसाठी समर्पित होते. एक कवी म्हणतो पती पत्नीसाठी “ऐसा जियो एक दुसरे के लिए I तु तु ना रहै वो वो ना रहे। हरतालिकेच्या सर्व एकनिष्ठ जिवांना हार्दीक शुभेच्छा!!

एस. एच. भवरे
पत्रकार तथा लेखक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *