कल्याण डोंबिवली जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धा नियंत्रण व तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षपदी अंकुर आहेर यांची निवड.
कल्याण( मनिलाल शिंपी)शासनाच्या आंतर शालेय मान्यताप्राप्त ४९ जिल्हास्तरीय खेळांच्या स्पर्धांकरीता तज्ञ समिती व तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र शासनाच्या शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक आदरणीय अंकुर आहेर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.तसेच या समितीमध्ये, सेक्रेड हर्ट स्कूल चे भूषण जाधव, वाणी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक श्री. गजानन वाघ, के.एम.अग्रवाल महाविद्यालयाचे फिजिकल डायरेक्टर
विजय सिंग, ज्ञान मंदिर शाळेचे मुख्याध्यापक व उत्कृष्ट क्रीडा संघटक श्री.महादेव क्षीरसागर,कल्याण शहरात क्रीडा संघटक म्हणून प्रत्येक खेळाचे योग्य नियोजन, कल्याण डी एस ओ चा जिल्हास्तरीय स्पर्धांचे उत्कृष्ट से नियोजन करणारे कै.भगवान भोईर इंग्लिश स्कूलचे क्रीडा प्रशिक्षक श्री कृष्णा माळी, विद्यानिकेतन स्कूल डोंबिवलीचे उत्कृष्ट ॲथलेटिक स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजक श्री.कृष्णा बनगर, साउथ इंडियन कॉलेजचे स्पोर्टस डायरेक्टर श्री.गणेश मोरे, यांच्यासह कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे क्रीडा पर्यवेक्षक श्री प्रवीण कांबळे हे या समितीचे पदसिद्ध सचिव आहेत. या समितीचा नेतृत्वाखाली व सल्ल्यानुसार 2024-25 च्या सर्व क्रीडा स्पर्धांचे नियोजन व तक्रार निवारण करण्यात येणार आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, ठाणे व कल्याण डोंबिवली महानगरपालिका, यांचे संयुक्त विद्यमाने शासनाच्या अनुदानित ४९ खेळांचे आयोजन महानगरपालिके मार्फत करण्यात आलेले आहे. त्याअनुषंगाने आंतर शालेय जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धा २०२४-२५ संपेपर्यंत सर्व खेळांवर नियंत्रण ठेवणे करीता तज्ञ व तक्रार निवारण समिती सोबत दिलेल्या आदेशाप्रमाणे सर्व खेळ प्रमुखांनी नावे सुचविल्या प्रमाणे समिती गठित करण्यात आलेली आहे. महानगरपालिकेचेक्रीडा पर्यवेक्षक श्री प्रविण कांबळे यांनी दिली आहे.