• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या एसटी आरक्षण तातडीने देण्यासाठी संविधानाने दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी करा,अमळनेरला सकल धनगर समाजा तर्फे तहसीलदारांना निवेदन.

Sep 20, 2024

Loading

धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या एसटी आरक्षण तातडीने देण्यासाठी संविधानाने दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी करा..

अमळनेरला सकल धनगर समाजा तर्फे तहसीलदारांना निवेदन.

अमळनेर प्रतिनिधी
धनगर जमातीसाठी असलेल्या अनुसूचित जमातीच्या एसटी आरक्षण तातडीने देण्यासाठी संविधानाने दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्यात यावी. या एकमेव मागणीसाठी पंढरपूर येथे सोमवार दिनांक 9 सप्टेंबर 2024 पासून शिक्षित तरुण अभ्यासक सामाजिक कार्यकर्ते आमरण उपोषणास बसलेले आहेत आज उपोषणाचा दहावा दिवस असून उपोषणकर्त्यांची तब्येत प्रचंड खालावली आहे तरीही सरकारकडून या उपोषणाची अद्याप कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही याचा संपूर्ण महाराष्ट्रातील धनगर समाज तीव्र निषेध करीत आहेत .
आज दिनांक 19 सप्टेंबर 2024 गुरुवार रोजी अमळनेर तहसीलदार यांच्यावतीने अनिल परदेशी साहेब यांना सदर धनगर समाजास तात्काळ अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्यात यावे या आशयाचे निवेदन देण्यात आले

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस भटक्या विमुक्त सेल तालुका अध्यक्ष एस.सी.तेले सर, मौर्य क्रांती संघ प्रदेश उपाध्यक्ष अण्णा साहेब बन्सीलाल भागवत, भाजप माजी शहराध्यक्ष आबासाहेब हरचंद लांडगे, हमाल मापाडी संघ अध्यक्ष रमेश देव शिरसाठ , प्रा. लक्ष्मण निळे सर,मौर्य क्रांती संघ तालुका अध्यक्ष गोपीचंद दादा शिरसाठ, गुलाबराव भागवत -सरपंच करणखेडा, आलेश धनगर -उपसरपंच निंभोरा, ए. बी .धनगर सर ,दिलीप ठाकरे-माजी सरपंच धानोरा, अनिल धनगर , धनराज लांडगे, जितेंद्र भालेराव ,भगवान धनगर ,राजू मोरे, ईश्वर हडप, विजय मोरे, विकास सूर्यवंशी, भाऊलाल पाटील, सचिन सिरसाठ, गणेश पाटील , उत्तम धनगर, निखिल बोरसे, प्रा.आर पी धनगर ,रवींद्र लांडगे, निवृत्ती कंखरे, सौरव भागवत, गोविंदा लांडगे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *