“चिमुकल्या कळया उमलतांना ….”*
*व्ही. एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पालक समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन
अमळनेर प्रतिनिधी
दुर्गा फाउंडेशन संचलित कै.श्री. दादासाहेब व्ही.एस.पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये आज दि: 24 -9 -2024,मंगळवार रोजी खास पालकांसाठी समुपदेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने शाळेत *प्रसिद्ध चिकित्सक, मानसोपचार तज्ञ तथा समुपदेशक माननीय डॉ.दौलत निमसे पाटील,शासकीय रुग्णालय जळगाव यांना आमंत्रित करण्यात आले होते. सोबत ठाकूर सर व काफीनाथ सर (संवेदना फेलो) हेही उपस्थित होते.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले.डॉ.पाटील सरांचे अमूल्य असे मार्गदर्शन ‘मुलांना समजून घेताना……’
‘चिमुकल्या कळया उमलतांना….’ या सुंदर विषयावर सरांनी पालकांना समुपदेशन केले. पालकांनी आपल्या मुलांसोबत अधिकाधिक वेळ घालवायला हवा. प्रत्येक मुलाची क्षमता ही वेगवेगळी असते यामुळे पालकांनी आपल्या मुलांवर अपेक्षेचे ओझे टाकू नये. प्रत्येक पालकांनी आपल्या मुलासोबत गुणात्मक वेळ घालवायला पाहिजे. शैक्षणिक विकासाबरोबरच मुलांचा शारीरिक मानसिक तसेच भावनिक विकासही तितकाच गरजेचा आहे.चिमुकल्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी मोबाईल नकोच-
सध्या लहान मुलांचे सर्वात आवडते खेळणे म्हणजे मोबाईल फोन. मुले जेवत नाही म्हणून त्यांच्या हातात मोबाईल दिला जातो.जेवताना मोबाईल पाहण्याच्या सवयीचे रूपांतर व्यसनात झाल्यास अडचणी वाढू शकतात.मोबाईल मुळे मुले चिडखोर होत आहेत, एकलकोंडी होत आहेत. त्याचबरोबर मुलांच्या हितासाठी पालकांनी देखील मोबाईलचा अतिवापर टाळला पाहिजे.
पालकांनी दिलेला वेळ मुलांचे भविष्य घडवेल-
कुठलीही सवय आपले मूळ पक्के करण्यापूर्वीच ते नष्ट करणे जरुरी असते.मुलांच्या सर्वांगीण विकासाचा विकासासाठी त्यांना भरपूर वेळ द्यायला हवा, त्यांच्या चांगल्या सवयी छंद शोधून त्यांना प्रोत्साहन द्यावे, त्यांच्याशी मोकळेपणाने संवाद साधावे त्यातून ती एकूण कोंडी होणार नाहीत.
जगण्याचा पासवर्ड :जीवनाची चतुसूत्री-
माणसाचे मन हे जर सुदृढ पक्के असेल तर जीवनात किती संकटे आली तरी ती आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो तसेच जीवनाची चतुसूत्री म्हणजे दुःख, त्याचा स्वीकार, मेहनत व समाधान याबद्दल पालकांना मार्गदर्शन केले.
या आणि अशा अनेक विषयांवर माननीय सरांनी पालकांना मार्गदर्शन केले.त्यांचे मार्गदर्शन ऐकून पालकही उत्सुक व आनंदी दिसत होते.शेवटी त्यांनी पालकांचे वेगवेगळ्या प्रश्नांचेही निरसन केले.
कार्यशाळेचे प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे चेअरमन माननीय श्री.उत्कर्ष पवार सर उपस्थित होते त्यांनीही पालकांना संबोधन केले. संस्थेच्या सचिव अलका पवार आणि शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा सोहिते यांच्या आयोजन व मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका स्वाती चव्हाण व पल्लवी येवले यांनी केले.तसेच आभार प्रदर्शन सचिव सौ. अलका पवार यांनी केले. संस्थेचे उपाध्यक्ष श्री. उमाकांत पाटील,शिक्षिका योगिता फाळके, मनीषा सोनार,संगीता पाटील,मनीषा ठाकूर,प्रतीक्षा पाटील, कविता पाटील, रोशनी महाजन तसेच शिक्षकेतर कर्मचारी योगिता पारधी यांचे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमूल्य असे सहकार्य लाभले.