कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी मागितली शरद पवार यांच्याकडे उमेदवारी…
दोन दिवसात आपला निर्णय जाहीर करणार- कृषीभूषण साहेबराव पाटील
अमळनेर प्रतिनिधी(ईश्वर महाजन)
अमळनेर तालुक्याचे माजी आमदार व कृषिभूषण साहेबराव पाटील हे अपक्ष आमदार म्हणून चांगल्या मतांनी निवडून आले होते व त्यांनी त्यांच्या काळात अनेक लोकप्रिय व कायमस्वरूपी लोकांच्या हृदयात त्यांनी जागा निर्माण केली होती.. याचे कारण म्हणजे अमळनेर तालुक्यातील ठोस कामे त्यांनी केली होती.. शरदचंद्र पवार यांच्याकडे अमळनेर तालुक्यात तुतारी या चिन्हावर आमदारकी लढवण्याची त्यांची इच्छा आहे अशी चर्चा आहे..
अमळनेर तालुक्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिली असता तेव्हाही कृषीभूषण साहेबराव पाटील यांनी त्यांची भेट टाळली होती.. मध्यंतरी काळामध्ये मंत्री अनिल पाटील व साहेबराव पाटील यांची गुप्त भेट झाली अशी सोशल मीडियावर बातमी व्हायरल झाली होती.. या बातमीने ते थोडे नाराज झाले होते.. दरम्यानच्या काळामध्ये साहेबराव पाटील हे शरद पवार गटांमध्ये जातील याची लोकांमध्ये चर्चा सुरू होती… पण सध्या तरी शरदचंद्र पवार गटामध्ये तुतारी या चिन्हावर कृषीभूषण साहेबराव पाटील यांना उमेदवारी मिळाली तर ते निवडून येतील अशी सध्या तरी अमळनेर तालुक्यात लोकांमध्ये चर्चा आहे…
कारण तालुक्यात माजी आमदार पाटील यांना मानणारा मोठा वर्ग आहे.. या संदर्भामध्ये माजी आमदार साहेबराव पाटील यांना विचारले असता शरदचंद्र पवार गटाने मला जर संधी दिली तर निश्चितच मी त्याचा विचार करू व आपली भूमिका दोन दिवसांमध्ये मी जाहीर करणार आहे असे मराठी लाईव्ह शी बोलतांना सांगितले..
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष ग्रामीण प्रमोद पाटील यांनी असे सांगितले की पाटील यांनी पक्षाकडे उमेदवारी मागण्याचा अर्ज केला आहे..
येणाऱ्या दोन-चार दिवसांमध्ये कृषीभूषण साहेबराव पाटलांनी निर्णय घेऊन तुतारी या चिन्हावर शरद चंद्र पवार गटातून उमेदवारी करावी अशी तरी सध्या चर्चा सुरू आहे.. पाटील हे निश्चितच निर्णय घेतील तालुक्यातील जनतेला अपेक्षा आहे… रोखठोक बोलणारा आमदार अमळनेरला मिळेल अशी सध्या तरी चर्चा ग्रामीण भागामध्ये लोकांच्या तोंडातून ऐकायला मिळत आहे..