अंशतः अनुदानित शाळांच्या टप्पा वाढ अघोषित शाळांना अनुदान मिळण्यासाठी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या झंझावात.
ठाणे:कल्याण ( मनिलाल शिंपी)अंशतः अनुदानित शाळांचा टप्पा वाढ, ओघोषित शाळांना अनुदान, त्रुटी पूर्तता अनुदान, शेवटच्या वर्गाची पटसंख्या, अनुदानाच्या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज निर्णय प्राधान्याने व्हावा म्हणून आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे व अन्य आमदार मंत्रालयात ठाण मांडून बसले होते. माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब,उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि शिक्षणमंत्री केसरकर साहेब, यांना भेटून मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज निर्णय घ्यावा म्हणून शर्तीचे प्रयत्न सुरू होते. मात्र अर्थ विभागाकडून फाईलवर एक रीमार्क राहिल्यामुळे आज फाईलमंत्रिमंडळ बैठकासाठी, त्यामुळे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी व शिक्षण मंत्री यांची समोरासमोर चर्चा घडवून आणली, माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितले की आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपल्या विषयावर चर्चा झाली मात्र* *फाईलवर रीमार्क्स राहिल्याने आज* *मंत्रिमंडळासमोर निर्णय झाला नाही, परंतु शुक्रवारी होणाऱ्या कॅबिनेट मध्ये फायनल निर्णय आम्ही घेत आहोत, सदरचा निर्णय सर्व आंदोलनकर्त्या कार्यकर्त्यांना समजावून सांगण्यासाठी* शिक्षणमंत्री दीपक केसरकर साहेब यांच्या दालनात* सर्व *आंदोलनकर्त्यांना बोलावले*
*वस्तुस्थिती सांगून आपला निर्णय शुक्रवारी शंभर टक्के होईल,*
*त्यानंतर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे आझाद मैदान उपस्थित राहून सर्व वस्तुस्थिती: सर्व आंदोलन* *कर्त्या कार्यकर्त्यांना सांगितले*
सर्व घडामोडी आमदार किशोर दराडे, आमदार किरण सरनाईक, मा.आमदार श्रीकांत देशपांडे, तुकाराम शिंदे, सुदर्शन त्रिगुणायत व सर्व आंदोलनकर्ते कार्यकर्ते उपस्थित होते.