एका दिव्यांग मुलांचे मनोगत…
“दिव्यांगत्व ही मर्यादा नाही, सामर्थ्य आहे”
नमस्कार मी एक दिव्यांग बोलतोय..नव्हे….
विनंती..करतोय .. मी दिव्यांग असल्यामुळे मला माहीती आहे .मी आपल्या(मुलींच्या आजच्या) लायकीचा नाही शारीरीक रित्या माझ्यावर कोणतीच मुलगी प्रेम करणार नाही अन् मी कसा प्रपोज करेल, मुलीचा हात मागेल ?सात जन्माची साथ कोणत्या तोंडाने मागेल. ? कोणी दूखाला जवळ करुन आयुष्य भर जख्म का करून घ्यावी…. परंतु भावना तर मला ही निसर्ग दत्तच ना ??त्यात माझा दोष तो काय हो??
दोष नसताना मला शिक्षा मिळालेली आहे. मी …..ही स्वप्न पाहिले आहे.पत्नीचे..औकात नसतांना कारण देवाशप्पथ त
मला माहीती आहे माझ्यासाठी कोणीतरी असेलच येथे…ज्यांना शरीर नाही प्रेम कळेल.. अपंगांसाठी कोणी तरी खऱ्याखुऱ्या अर्थाने साथ देईल..उभ्या जगाला सांगेल.”यांना ही भावना आहेत..त्यांना खरी साथीदार ची आवश्यकता आहे ते दुःखी आहेत सूख आपण देवू या..असं ही जीवन दुःख चेच नाव …दुसरे..
आपण जर अपंगाशी लग्न केलं तर जीवनाचं सार्थक होईल…बाकी आपण विचार करा लोक तर पूरुष प्रधान संस्कृती त स्त्रीशोषण करीतातच ….अपंग मात्र देवीमानेल…खूल आकाश अन् खरं सांगायचं.तर खरं स्वातंत्र देईल ..सर्वस्वी आपलाच राहील..मरस्तव आपल्या ऋणात राहील …. पुण्यकर्म करा
पुण्यकर्म करा
वरा अपंग वरा
तुम्ही दैवी रूप
दुःख अपंगा पदरी खूप
द्या साथ
हातात हात
तो जगेल
तुमचं नाव निघेल
कीर्ती ही
तुमची चंद्र सुंऱ्या परी
दुःख दूर करणं
सौभाग्य अखंड तीच पोरं बिचारी
माझ्याही वाळवंटी आयुष्य त सूखाची सरीता यावी जी माझी प्रियंका व्हावी माझी ही आराधन सामाजिक दैवींनी ऐकूण मला कृता कृत करावे. माझी अपेक्षा आहे की मला आता जास्त प्रतिक्षा करायला लावू नये. माझी मनीषा लवकरात लवकर पुर्ण व्हावी..या पंगूची शेवटची आशा.. देवांनी पुर्ण करावी.. तीने स्वप्नना त येऊन मला म्हणावं….
……………………….तू माझा राजा
………………………………….मी तुझीच राणी
……………………….तुझ्या डोळ्यात
………………….येऊ देणार नाही पाणी
तू दिव्यांग जरी असला
तरी तू मला हवा
तूझ्या च सह
माझा संसार फूलावा
दुःखाच्या उन्हात
होईल रे मी सावली
पवित्र प्रेमाची
काहानी आपली
स्त्री शोषणाचा
नाही तू पूजक
तू बोलतो रे
खरं रोखठोक
मला तूच देशील
मोकळं आकाश
खरं स्वातंत्र्य
जगणं मनमोकळ झकास
तू दिव्यांग…….
तुझी लाभो संग
प्रेमाचे उधळू
रे रंग…….
तीने माझ्या मनातील भावना समजून घ्याव्या.मी जीव देईल पण तिचे उपकारक विसरणार नाही.खरच ती फक्त माझी असेल जीचा जगातील पहीला राजकुमार अपंग असेल. आमच्या प्रेमाला स्वार्थाचा पुसटशी ही किनार नसेल….
………..तिला मी जगातील सर्व सुख देण्याचा प्रयत्न करेल……ती जरी अपंग असली तरी.. विधवा असली तरी………
……………..कारण
आपण कोणावर प्रेम करतो
हे महत्त्वाचे नसते
आपल्या वर प्रेम करणं
महत्त्वाचं असत
शब्दांकन
प्रा.प्रकाश पाटील
स्पर्धा परीक्षा प्रमुख
अमळनेर