• Tue. Jun 17th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

व्हि.एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये “वार्षिक क्रीडा महोत्सव” उत्साहात संपन्न*

Dec 23, 2024

Loading

*व्ही.एस. पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये “वार्षिक क्रीडा महोत्सव” उत्साहात संपन्न*

अमळनेर प्रतिनिधी
अमळनेर येथील दुर्गा फाउंडेशन संचलित कै श्री दादासाहेब व्ही. एस.पवार इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये *वार्षिक क्रीडा महोत्सव 2024-25* उत्साहात पार पडला. शाळेच्या मैदानावर दिनांक: 19, 20, 21 डिसेंबर 2024 असे तीन दिवस हा वार्षिक क्रीडा कार्यक्रम पार पडला.
या तीन दिवसीय कार्यक्रमाचा शुभारंभ कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे चेअरमन माननीय श्री. उत्कर्ष पवार, संस्थेच्या सचिव माननीय सौ.अलका पवार आणि उपाध्यक्ष मा. श्री. उमाकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून मुख्याध्यापिका वर्षा सोहिते यांनी शालेय क्रीडा क्षेत्राचा आढावा सादर केला. त्यानंतर उपस्थित प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शालेय जीवनातील आठवणी तर सांगितल्याच त्याचबरोबर मैदानावर विविध खेळ खेळा,निरोगी रहा असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला.
विद्यार्थ्यांनी क्रीडा ज्योत प्रांगणात मिरवली. त्यानंतर किडा महोत्सवाला सुरुवात झाली. पूर्व प्राथमिक वर्गासाठी पॅकिंग बॅग्स, बॉल बॅलेन्सिंग, बुक बॅलन्सिंग,रनिंग रेस असे विविध प्रकारचे मजेशीर खेळ आयोजित केले होते. तर प्राथमिक वर्गासाठी सॅक रेस 100 मीटर धावणे (रनिंग), बॉटल रेस, लेमन अँड स्पून,थ्री लेग्स रनिंग, खो-खो, कबड्डी इत्यादी स्पर्धा आयोजित केल्या होत्या.
सर्व क्रीडा स्पर्धेचे आयोजन व निरीक्षण क्रीडा शिक्षिका योगिता फाळके व प्रतीक्षा पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षिका स्वाती चव्हाण व मनीषा सोनार यांनी केले तर आभार संगीता पाटील यांनी मानले. शिक्षका मनिषा ठाकूर, रोशनी महाजन, कविता पाटील तसेच शिक्षकेतर कर्मचारी योगिता पारधी यांचे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अमूल्य सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *