• Fri. Jul 4th, 2025

राज्यातील सर्वच बातम्यांना यथायोग्य व वेगवान प्रसिद्धी देणारे न्युज वेबपोर्टल

दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्या संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे सभागृहात सप्ष्टीकरण*

Mar 22, 2025

Loading

*दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्या संदर्भात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे सभागृहात सप्ष्टीकरण*

मुंबई, २२ मार्च : दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करण्याच्या संदर्भात आमदार विक्रम काळे यांनी विचारलेल्या प्रश्नाला विधान परिषद सभागृहात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सविस्तर उत्तर दिले.

पाटील याबाबत म्हणाले, दुष्काळ घोषित झाल्यानंतर एकूण १२ प्रकारच्या सवलती आपण देतो त्यातील हि एक सवलत आहे. यामध्ये परीक्षा फी आपण माफ करतो. ती परीक्षा फी माफ केल्यानंतर काही विद्यार्थी ती फी भरतच नाहीत, आणि ज्यांनी फी भरली आहे त्यांना ती परत केली जाते. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ ८० टक्के विद्यार्थी असे आहेत कि, त्यांची फी हि त्यांना भरावीच लागत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे दुष्काळ घोषित होतो तेव्हा तो ठराविक भागात होतो. काही विद्यार्थी हे रिपीटर असतात. त्यामुळे वेगवेगळ्या मार्गाने हे फॉर्म रिजेक्ट होत असतात. विक्रम काळे यांनी मुद्दा मांडल्यानंतर पुन्हा एकदा याची स्फुटनी केली जाईल. निधीची कमतरता नाही. आततापर्यँत आपण ५३ हजार ४२९ विद्यार्थ्यांना आपण लाभ दिला असल्याची माहिती चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ यातील दुष्काळी फी आपण परत करत असतो. यासाठी केवळ ४० टक्के विद्यार्थ्यांना आतापर्यंत परतावा मिळाला आहे. अद्याप ६० टक्के विद्यार्थी परतवा बाकी आहे. तर हा परतावा कधी पर्यंत दिला जाईल याबाबत विक्रम काळे यांनी प्रश्न उपस्थित केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *